Delhi

? आताची मोठी बातमी..मुख्यमंत्री ठाकरेंनी निवडणूक शपथपत्रात माहिती लपवली.. किरीट सोमय्या यांची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार..

? आताची मोठी बातमी..मुख्यमंत्री ठाकरेंनी निवडणूक शपथपत्रात माहिती लपवली.. किरीट सोमय्या यांची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार..

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक शपथपत्रात माहिती लपवल्याचा आरोप करत किरीट सोमय्या केंद्रीय निवडणूक आयोगात गेले आहेत. आज केंद्रीय निवडणूक आयुक्तांकडे सोमय्यांनी अठरा कागदपत्र साडेतीनशे पानांची सुपूर्द केले. लवकरच ह्या बाबतीत निवडणूक आयोग मुख्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण मागू शकतो असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

प्रकरण सिद्ध झाले तर केवळ आमदारकीच जाणार नाही तर अफरातफरीचा सुद्धा गुन्हा दाखल करावा लागेल, असा आरोप सोमय्या यांनी एबीपी माझाशी बोलताना केला आहे. भाई ठाकूर यांच्या प्रकरणाचा संबंध संजय राऊत यांच्याशीही आहे.
संजय राऊत आणखी एका माध्यमातून पीएमसी घोटाळ्याशी जोडले आहेत, असा आरोप देखील सोमय्या यांनी केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रकात 19 घरे जी 23 हजार 500 स्केअर फूटाची आहेत ती दाखविलेली नाहीत, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन याआधी केला होता. त्याचवेळी त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले होते.

सोमय्या यांनी सांगितलं होतं की, रश्मी उद्धव ठाकरे यांच्या नावाने या प्रतिज्ञापत्रकात फक्त अन्वय नाईक कुटुंबाकडून तीस जमिनी (सात बारा) चे आर्थिक व्यवहार झाले असल्याचे ठाकरेंनी भासवले आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रकात 19 घरे जी 23 हजार 500 स्केअर फूटाची आहेत. ज्याची किंमत 5.29 कोटी आहे. ती दाखविलेली नाही. ठाकेंनी ही एवढी घरे, संपत्ती ही जनतेपासून लपवली, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. 11 नोव्हेंबर, 2020 रोजी उद्धव ठाकरे कुटुंब आणि अन्वय नाईक कुटुंब यांचे जमिनी संबंधी आर्थिक व्यवहारासंबंधीचा खुलासा केला होता. शिवसेनेच्या डझनभर नेत्यांनी मला धमक्या दिल्या होत्या, असा दावाही सोमय्यांनी केला होता.
हे मिशन सुरुच राहणार : किरीट सोमय्या
उद्धव ठाकरे कुटुंबाचे अपारदर्शक जमिनी, बिल्डर, आर्थिक व्यवहार जनतेपुढे आणण्याचे मिशन सुरूच राहणार असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. 11 नोव्हेंबर 20 रोजी ठाकरे, नाईक परिवाराचे जमिन व्यवहार उघडकीस आणल्यानंतर 12 नोव्हेंबर, 2020 ला रश्मी उद्धव ठाकरे यांनी 21 मार्च, 14 ते 12 नोव्हेंबर 2020 पर्यंतच्या त्या जमिनीवरील 19 घरांचा, घरपट्टी कर व अन्य कर ताबडतोब आरटीजीएसद्वारे सरकारी खात्यात, कोर्लई ग्रामपंचायत यांच्या खात्यात भरला. असा दावाही सोमय्यांनी केला होता.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button