Amalner

Amalner: शेतकरी पुत्राची गगन भरारी..

Amalner: शेतकरी पुत्राची गगन भरारी..

अमळनेर तालुक्यातील मारवड येथील शेतकऱ्याचा मुलगा तन्मय जितेंद्र पाटील परीक्षा उत्तीर्ण होऊन नवोदय विद्यालयासाठी यशस्वी निवड झाली आहे. त्याच्या यशाबद्दल त्याच्यासह कुटुंबियांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
तन्मय हा सू. हि. मुंदडे हायस्कूल, मारवडचा विद्यार्थी असून त्याचे वडील जितेंद्र पाटील हे प्रगतशील शेतकरी तर आई जोत्स्ना ह्या गृहिणी आहेत. तन्मयने मागील शैक्षणिक वर्षात ही नवोदयची परीक्षा दिली. त्यात तो उत्तीर्ण झाला असून त्याचे पुढील शिक्षण आता नवोदय विद्यालयात होणार आहे. त्याला आईवडील, तसेच ज्ञानेश्वर साळुंखे, व शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button