सविता न्हावी ट्रस्टच्या वतीने पोलिसांना मास्क सनिटायझर वाटप…
महेश हुलसूरकर कर्नाटक
कर्नाटक : हुलसूर येथील सविता न्हावी ट्रस्टच्या वतीने मोफत पोलीस ठाणे व समाजातील सर्वांना घरोघरी जाऊन मास्क व सनिटायझर देण्यात आले.
या महामारी कोरोनाने थैमान घातल्याने त्यातच हातावरील पोट असलेल्या नागरिकांना याचा फटका जास्त बसला आहे व सविता न्हावी समाजावर ही दुष्परिणाम झाले आहे सर्व ठिकाणी लाँक डाउन झाल्याने न्हावी समाजावर ही लाँक डाउन ची वेळ आली आहे दुकान बंद झाल्याने हातावर पोट असलेल्या समाजावर परिस्थिती गंभीर आहे तरीही देखिल सविता न्हावी ट्रस्टच्या वतीने स्वखर्चाने पोलीस ठाण्यात व समाजातील सर्व नागरिकांना मास्क सनिटायझर मोफत देण्यात आले.
यावेळी उपस्थित ता.अध्यक्ष शशिकांत गायकवाड, प्रविण सुर्यवंशी, उमेश गायकवाड, संतोष सुर्यवंशी, गिरीश गायकवाड, आत्मानंद गायकवाड, छोटु गायकवाड, नागेश सुर्यवंशी, शुभम कारागीर, प्रकाश कारागीर आदी होते.