Chalisgaon

कन्नड घाटात काळीमा फासणारी अभूतपूर्व घटना

कन्नड घाटात काळीमा फासणारी अभूतपूर्व घटना
चाळीसगाव: मनोज भोसले
1 जानेवारी रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास कन्नड घाटाच्या वर भाऊच्या ढाब्यासमोर काल रात्री 10:30 वाजेच्या सुमारास कन्नड कडून येणारी क्रुझर गाडी रस्त्याच्या कडेला थांबली त्यातून काही महिला खाली उतरल्या बराच वेळ झाल्याने धाबा मालक त्या गाडीकडे गेल्यानंतर त्यांना विचारपूस केली एवढ्या रात्री इथेच थांबले ड्रायव्हरने लघुशंकेचे कारण सांगून आम्ही निघतो आहे अस संगत धाबा मालकाला टाळण्याचा प्रयत्न केला व थोड्या वेळाने तेथून चाळीसगाव च्या दिशेने निघून गेले परंतु काही वेळानंतर धाबा मालकाला रस्त्याच्या कडेला लहान बाळाचा रडण्याचा आवाज आल्याने तो तिकडे धावून गेला पाहतो तर एका टोपल्या खाली असलेल्या लहान बाळाचा रडण्याचा आवाज होता त्यांनी ताबडतोब घाटातील वायरलेस यंत्रणा येथे ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस प्रवीण पाटील यांना जाऊन ही हकीकत सांगितली प्रवीण पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी जाऊन पाहिले असता तेथे एका महिलेने स्री जातीच्या बाळाला जन्म दिलेला होता व ते त्यांनी टोपली खाली झाकून निघून गेले होते असे लक्षात आले 108 अंबुलान्स ला ताबडतोब फोन केला परंतु ॲम्बुलन्स लवकर आले नाही त्याच्याआत कन्नड ग्रामीण पोलिसांची गाडी पेट्रोलिंग करत असताना तेथे पोहोचली पो.कॉ. प्रवीण पाटील यांनी अंगावरचे रुमाल व टोपी काढून त्या बाळाच्या अंगावर झाकून त्याला कन्नड ग्रामीण पोलिसांच्या सोबत कन्नड रुग्णालयात पाठवण्यात आले या घटनेची माहिती फोनवरून चाळीसगाव महामार्ग चे पो हे कॉ योगेश बेलदार व पो हे कॉ वीरेन्द्र राजपूत यांना दिली असता त्यांनीही चाळीसगाव हद्द सोडून असतानाही घटनास्थळी पोहोचलेव चौकशी करून करून त्या क्रूजर गाडी चा शोधाशोध करण्याचा प्रयत्न केला परंतु गाडी मिळून आली नाही चाळीसगाव पोलिसांच्या या कार्यतत्परतेमुळे एका निरागस बाळाचा जीव वाचला त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे यावेळी प्रवीण पाटील यांना दोन पोलीस मित्र प्रवीण गोत्रे व भोलाभाऊ यांनी मोलाचे सहकार्य केले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button