Kolhapur

अनंतशांती तर्फे कागल तालुक्यातील ग्रामसेवकांना अल्सेनिक अल्बंम वाटप

अनंतशांती तर्फे कागल तालुक्यातील ग्रामसेवकांना अल्सेनिक अल्बंम वाटप

कोल्हापूर-तुकाराम पाटील

ग्रामीण जनता हिच देशाची महानता आहे हिच महानता जपन्यासाठी ग्रामपचायत स्तरावर ग्रामसेवक यांनी कोविड१९ या जागतिक आपत्ती मध्ये राञ आणि दिवस ग्रामपंचायत व गावातील समाजासाठी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता नागरिकांच्या सुरक्षितेसाठी वैद्यकीय मदत. सल्ला .समुपदेशन व माणुसकी व सामाजिक जाणिवेतुनबजाविलेले प्रत्येक कर्तव्य खरच उल्लेखनीय व प्रेरणादायक आहे आपण आपल्या गावासाठी केलेल्या सामाजिक कार्याचा आढावा घेवुन अनतशाती बह्हूउद्देशिय सामाजिक सेवा सस्थेमार्फत कोरोना प्रतिबंधक अल्सेनिक अल्बम या औषधाचे वाटप पंचायत समिती मध्ये आज करण्यात आले .

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कागल गटविकास अधिकारी डाँ शबाना मोकाशी (मुल्ला) ह्या होत्या तर विस्तार अधिकारी अमोल मुंडे .विस्तार अधिकारी सुरेश कुंभार .सहाय्यक गटविकास अधिकारी अजित देसाई .याच्या प्रमुखउपस्थितीत व अनंतशांती सामाजिक सेवा संस्थेचे संस्थापक भगवान गुरव याच्या हस्ते औषधांचे वितरण करण्यात आले .अध्यक्षा माधुरी खोत यानी प्रास्तविक केले सचिव अरुणा पाटिल क्रांतीविर फिरगोंजी सस्थेचे अध्यक्ष प्रमोद पाटील याच्यासह वैद्यकीय अधिकारी डाँ.आश्विनी खोराटे, डाँ नदिनी गावडे,डाँ दिपा कुष्टे याच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पाडला यावेळी कागल सर्व ग्रामपचायत ग्रामसेवक ग्रामविस्तार अधिकारी व इतर कर्मचारी उपस्थित होते आभार प्रमोद पाटील यांनी मांडले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button