Yawal

संजय गांधी निराधार समितीच्या सदस्य पदी योगिता पाटील

संजय गांधी निराधार समितीच्या सदस्य पदी योगिता पाटील

यावल : विरावली येथील रहिवासी छत्रपती शिवाजी महाराज फाऊंडेशनच्या सचिव सौ योगिता देवकांत पाटील यांची संजय गांधी निराधार योजनेच्या तालुका सदस्यपदी निवड होताच विरावली ग्रामपंचायतीच्या परिवर्तन पॅनलच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य सौ शोभा युवराज पाटील, शकुंतला विजयसिंह पाटील, हमिदा टेनु तडवी व अ‍ॅड.देवकांत बाजीराव पाटील ग्रा प
सदस्य तथा राष्ट्रवादी युवक अध्यक्ष यावल यांनी व विरावली ग्रामपंचायत सदस्यांनी व गावातील जेष्ठ महिला कमलाबाई पाटील , प्रतिभा पाटील , कल्पना पाटील ,कृष्णा पाटील आदी नी सौ योगिता देवकांत पाटील यांचा सत्कार करत अभिनंदन केले .
सौ योगिता देवकांत पाटील यांनी
संजय गांधी निराधार योजनत त्यांची मा.जिल्ह्याधिकारी अभिजित जी राऊत साहेब यांनी नियुक्ती केल्या बद्दल मा.ना. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यावल तालुक्यातून विरावली गावाला पहिल्यादाच एका उच्च शिक्षित महिला प्रतिनिधीला च्या नावाला शिफारस केल्याबद्दल यावल -रावेर विधानसभेचे आमदार मा. शिरीष दादा चौधरी व संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष शेखर दादा पाटील यांनी निवड केल्या बद्दल आभार मानत विरावली गावसह परिसरातील तालुक्यातील सर्व निराधार महिला ना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहू असे योगिता देवकांत पाटील यांनी सांगितले .यावल तालुक्यातील सर्वसामान्य गोर- गरीब-गरजू निराधार लोकांच्या हिता साठी काम करण्याची जबाबदारी दिल्या बद्दल राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मा. रवींद्र भैय्या पाटील विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी साहेब,माजी मंत्री एकनाथराव खडसे साहेब जळगांव जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मा. संदीप भैय्यासाहेब पाटील शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष तथा मुक्ताईनगर विधान सभेचे आमदार मा .चंद्रकांत पाटील काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा जि प सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मुकेश येवले विधानसभेचे क्षेत्र प्रमुख अनिल साठे शिवसेनेचे तालुका अध्यक्ष रवींद्र सोनवणे यांचे आभार मानले आहे . सौ योगिता पाटील यांचे नियुक्ती बद्दल विरावली गावसह सह तालुक्यातून सामाजिक व राजकीय क्षेत्रातुन
सौ पाटील यांना मान्यवरांनी अभिनंदन सह पुढील भावी वाटचालीस हार्दीक शुभेच्या दिल्या आहेत .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button