Yawal

यावल सह तालुक्यात अवैध्द वृक्षाची वाहतुक थांबवावीकॉग्रेस सेवा फॉडेशनचे जिल्हा अध्यक्ष जलील पटेल यांची मागणी.

यावल सह तालुक्यात अवैध्द वृक्षाची वाहतुक थांबवावी
कॉग्रेस सेवा फॉडेशनचे जिल्हा अध्यक्ष जलील पटेल यांची मागणी.

शब्बीर खान यावल

यावल : यावल शहर सह परिसरात व तालुक्यात काही दिवसांपासून , मोठ्या प्रमाणावर डेरेदार वृक्षांची अवैध वृक्षतोड करुन लाकूडचोरी केली जात असून वनविभागाचे अधिकारी मात्र या प्रकाराकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. या साठी कॉग्रेस सेवा फॉडेशन चे जिल्हा अध्यक्ष हे. मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबई येथे भेट घेऊन यावल तालुक्यात होणारी अवैद्ध लाकडाची अवैध्द वाहतुक व.चोरी याबाबत चर्चा करणार व वनविभागाच्या भष्ट्राचार अधिकाऱ्याच्या निलंबना विषयी कैफियत मांडनार असे जलील पटेल यांनी सांगीतले. तस्करांना आता कोणाचाही धाक राहिलेला नसून दिवसाढवळ्या अवैध वृक्षतोड करुन लाकूडचोरी होत असल्याचे दिसून येत आहे. वन अधिकारी पुर्व विभाग विक्रम पदमोर व वन पश्चिम विभाग विशाल कुटे. हे अधिकारी यांना वाहतुक.विषयी बोलले असता ते उडवा उडवीचे उत्तरे देतात. अवैध्द लाकडाची वाहतुक नेमकी जाते कुठे असा मोठा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे. कोणाच्या आशिर्वादाने ही वाहतुक सुरू आहे ? यामध्ये लाकूड तस्कर व वनविभागाचे अधिकारी यांची अर्थपूर्ण भागीदारी तर नाही ना? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.


प्रती क्रीया – अवैध्द वृक्षाची वाहतुक वन अधिकारी यावल यांनी न थांबवली आणि त्याच्या वर नियमानुसार कार्यवाही केली नाही तर मी . मुंख्यमंत्रि व वनमंत्री .. यांच्या शी स्वतह भेट घेउन अशा भष्ट्राचारी अधिकारी यांची निलंबनाची मागणी करेल अशी माहीती कॉग्रेस सेवा फॉडेशनचे जिल्हा अध्यक्ष जलील पटेल. यांनी आमच्या प्रतिनीधी यावल यांच्याशी बोलतांना दिली

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button