Faijpur

प्रगतीसाठी महिला व्यक्तिमत्व विकास आवश्यक आहे डॉ.व्ही व्ही काटदरे

प्रगतीसाठी महिला व्यक्तिमत्व विकास आवश्यक आहे डॉ.व्ही व्ही काटदरे

सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपूर तालुका यावल

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विद्यार्थी विकास विभाग व धनाजी नाना महाविद्यालय फैजपुर विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने युवती सभेअंतर्गत एक दिवसीय व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन दिनांक 5/3 /22 या दिवशी धनाजी नाना महाविद्यालयात करण्यात आले कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रा चे अध्यक्ष मा. प्राचार्य डॉ.पी.आर चौधरी होते उद्घाटक डॉ. व्ही व्ही काटदरे चेअर प्रोफेसर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव हे होते त्यांनी मुलींचा व्यक्तिमत्व विकास घडणे आवश्यक आहे व समाजाच्या देशाच्या प्रगतीसाठी व्यक्तिमत्व विकास शिबिर ही युवतींसाठी महत्वाची कार्यशाळा आहे हे सांगितले अध्यक्षीय मनोगतात मा. प्राचार्य डॉ.पी .आर चौधरी यांनी केवळ दिसणं रंगरूप म्हणजे व्यक्तिमत्व नाही व्यक्तिमत्व विकास कसा घडेल याचा युवतींनी स्वतः प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी युवतींची स्वतः अंतर प्रेरणा आवश्यक आहे उपप्राचार्य डॉ. उदय जगताप डॉ. अनिल भंगाळे विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. जी जी कोल्हे डॉ. मधुलिका सोनवणे आदी मान्यवरांची उपस्थिती प्रमुख होती कार्यशाळेत प्रथम पुष्प डॉ. व्ही व्ही काटदरे त्यांनी विचाराचे व्यवस्थापन या विषयावर विद्यार्थिनींना उद्बोधन केले व सकाळ व सकारात्मक विचारांचा जीवनातील फायदा युवतींना पटवून दिला द्वितीय पुष्प डॉ. मधुलिका सोनवणे व्यवस्थापन शास्त्र विभाग कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांनी मी स्वामिनी या विषयावर युवतींना मार्गदर्शन केलं व आरशशिवाय स्वतःची ओळख निर्माण करावी हे सांगितले उत्तम कार्याचा वारसा हृदयात कोरा हे विशद केले कार्यशाळेचे तृतीय पुष्प डॉ.योगिता चौधरी कला वाणिज्य महाविद्यालय शेंदुर्णी यांनी मांडलं त्यांनी सूत्रसंचालन एक कला या विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले व्यासपीठ व वक्ता यांना जोडणारा दुवा म्हणजे सूत्रसंचालक असतो हे सांगितले कार्यशाळेच्या चतुर्थ सत्रात डॉ.राजश्री नेमाडे धनाजी नाना महाविद्यालय फैजपुर यांनी उत्तम नेतृत्व व सकारात्मक विचार या विषयावर मार्गदर्शन केले कामाला दिशा व गती देण्यासाठी उत्तम नेतृत्व किती आवश्यक आहे व त्याचबरोबर सकारात्मक विचारांचा व्यक्तिमत्त्वावर कसा परिणाम होतो हे सांगितले कार्य शाळेचा समारोप उपप्राचार्य डॉ.अनिल भंगाळे यांच्या हस्ते करण्यात आला त्यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात सांगितले की युवतींनी स्वतःचा चांगला विकास केला तर कुटुंबाचा राष्ट्राचा विकास त्या करू शकतात आपले न्यूनगंड ओळखून त्यांना दूर करण्याचा प्रयत्न करा कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवती सभा प्रमुख डॉ.सविता वाघमारे यांनी केले.विद्यार्थी विकास विभागा अंतर्गत डॉ.जी जी कोल्हे विद्यार्थी विकास अधिकारी यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. कु. आचल तायडे व राधिका बुजगावकर या विद्यार्थिनींनी कार्यशाळे बद्दल आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य अनिल सरोदे प्रा. डी बी तायडे यांचे मार्गदर्शन लाभले कार्यशाळेसाठी डॉ. कल्पना पाटील प्रा. विकास वाघुळदे डॉ. राजश्री नेमाडे डॉ. सरला तडवी प्रा.पल्लवी भंगाळे डॉ.सीमा बारी डॉ. आरती भिडे प्रा. वैशाली कोष्टी डॉ. हरीश तळेले प्रा डॉ राजेंद्र राजपूत प्रा. धीरज खैरे श्री गणेश चव्हाण शेखर महाजन, धर्मेंद्र मोरे यांचे सहकार्य लाभले संपूर्ण कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. शुभांगी पाटील यांनी व आभार डॉ. जयश्री पाटील यांनी मानले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button