India

? STUDENT FORUM…आज पासून सुरू करत आहोत…नवीन सदर खास स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवा वर्गा साठी… स्पर्धा परीक्षा व्याख्या आणि स्वरूप….

? STUDENT FORUM…आज पासून सुरू करत आहोत…नवीन सदर खास स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवा वर्गा साठी..स्पर्धा परीक्षा व्याख्या आणि स्वरूप….

विविध नागरी सेवेच्या पदांसाठी पद भरती होत असते.या पद भरती साठी लागणाऱ्या उमेदवारांच्या विविध परीक्षा घेतल्या जातात.त्या म्हणजेच स्पर्धा परीक्षा होय. यात एमपीएससी, स्टाफ सिलेक्शन, बँकिंग, रेल्वे, पोस्ट, संरक्षण दल, एलआयसी अशा विविध परीक्षांचा समावेश असतो.अगदी अशाच प्रकारे ज्यांचा एमपीएससी (राज्य सेवा परीक्षे) चा अभ्यास परिपूर्ण असतो ते विद्यार्थी पोलीस भरती , तलाठी, लिपिक अशा सरळसेवा परीक्षा अगदी सहज उत्तीर्ण होताना दिसतात.आपल्याकडे MPSC आणि UPSC म्हणजेच स्पर्धा परीक्षा असा गैरसमज असतो.

स्पर्धा परीक्षा म्हणजे काय ?

अनेकांना अनेकदा हेच माहिती नसते अथवा बऱ्याच वेळा अनेकांचा हाच मोठा गैरसमज असतो की स्पर्धा परीक्षा म्हणजे फक्त MPSC UPSC . तर सर्वप्रथम हे लक्षात घ्या की शासन मग ते राज्य शासन असो अथवा केंद्र शासन रिक्त पदे आणि गरजे अनुसार पदभरती करत असत. आता ही पदभरती करायची कशी? तर त्यासाठीच सर्वप्रथम वृत्तपत्रे आणि प्रसार माध्यमांवर त्या त्या विभागाद्वारे रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात दिली जाते. या जाहिरातीत पात्रतेच्या सर्व अटी आणि सूचना दिलेल्या असतात. या सूचनांचे पालन करून अर्ज मागविले जातात. आता अनेकजण या पदासाठी इच्छुक असतात मग त्या सर्व उमेदवारांमधून त्या त्या पदाकरिता योग्य उमेदवार निवडायचे कसे? त्यासाठीच जी परीक्षा घेतली जाते तिला स्पर्धा परीक्षा असे म्हणतात!

आता प्रत्येक पदाकरिता या स्पर्धा परीक्षेचे स्वरूप वेगवेगळे असते जसे की गृह खात्यात जी पोलीस भरती केली जाते त्या पदासाठी उमेदवार शारीरिक स्वरूपात देखील परिपूर्ण असायला हवा मग अशा पदांसाठी लेखी परीक्षे सोबतच शारीरिक गुणवत्ता चाचणी सुद्धा घेतली जाते!

शासनाच्या प्रत्येक विभागातील पदभरती साठी त्या त्या विभागात अशा स्वरूपांच्या स्पर्धा परीक्षा होत असतातच,
त्यापैकी काही मुख्य स्पर्धा परीक्षा :-

  1. युपीएससी
  2. एमपीएससी
  3. स्टाफ सिलेक्शन
  4. बँकिंग
  5. रेल्वे
  6. पोस्ट
  7. संरक्षण दल
  8. एलआयसी, इत्यादी.
  • वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा…
  1. राज्य सेवा परीक्षा (State Services Examination)
  2. पोलीस उपनिरीक्षक परीक्षा (Police Sub Inspector Examination)
  3. विक्रीकर निरीक्षक परीक्षा (Sales Tax Inspector Competitive Examintion)
  4. कर सहायक गट-क परीक्षा (Tax Assistant Examination)
  5. सहायक परीक्षा (Assistant Examination)
  6. लिपिक-टंकलेखक परीक्षा (Clerk typist Examination)
  7. महाराष्ट्र वनसेवा परीक्षा (Maharashtra Forest Services Examination)
  8. महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा (Maharashtra Agricultural Services Examination)
  9. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट अ परीक्षा (Maharashtra Engineering Services, Gr-A Examination)
  10. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट ब परीक्षा (Maharashtra Engineering Services, Gr-B Examination)
  11. दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी, प्रथम वर्ग परीक्षा. Civil Judge (Jr. Div.) Judicial Magistrate (Ist Class) Competitive Exam
  12. सहायक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा (Assistant Motor Vehicle Inspector Examination)
  13. सहायक अभियंता (विद्युत) श्रेणी -२, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, गट-ब (Assistant Engineer (Electrical) Grade-2, Maha. Electrical Eng. Services, B)

क्रमशः…पुढील भागात पाहू या अभ्यासक्रम…..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button