India

Health:Breast Cancer: भाग- 2 स्तनांचा कर्करोग लक्षणे आणि काळजी… आणि हो पुरुषांना देखील होतो ब्रेस्ट कॅन्सर…

Health:Breast Cancer: स्तनांचा कर्करोग लक्षणे आणि काळजी… आणि हो पुरुषांना देखील होतो ब्रेस्ट कॅन्सर…

स्तनाचा कर्करोग हा एक असा कर्करोग आहे जो स्तनाच्या पेशींमध्ये तयार होतो. जेव्हा स्तनाच्या पेशी नियंत्रणाबाहेर वाढू लागतात तेव्हा कर्करोग सुरू होतो. स्तनाचा कर्करोग सामान्यतः स्त्रियांमध्येच दिसत असला तरी क्वचित प्रसंगी पुरुषांमध्ये देखील होतो. स्तनाचा कर्करोग हा जगभरातील कर्करोगाच्या सर्वात सामान्य प्रकारांपैकी एक आहे. स्तनाच्या कर्करोगाने ग्रस्त बहुतेक महिलांचे वय 50 वर्षांहून अधिक असते , परंतु तरुण स्त्रियांना देखील याचा त्रास होऊ शकतो.
स्तनाच्या कर्करोगाचे पहिले लक्षात येण्याजोगे लक्षण म्हणजे स्तनामध्ये वेदनारहित गाठ असणे. बहुतेक स्तनांच्या गाठी कर्करोग नसलेल्या असतात, परंतु डॉक्टर नेहमी तपासणी करण्याचा सल्ला देतात. तुम्हाला खालीलपैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

  • गाठीसारखा आकार दिसून येणे
  • एक किंवा दोन्ही स्तनांच्या आकारात कोणताही बदल
  • दोन्ही काखेत गाठ किंवा सूज
  • स्तनाग्रातून कोणताही स्त्राव किंवा त्याभोवती पुरळ येणे
  • निपलच्या आजूबाजूला लाल होणं किंवा पुरळ येणं
  • स्तन किंवा काखेत कायम दुखणं
  • स्तनांवरील त्वचेत बदल

स्तनाच्या कर्करोगाबाबत लोकांमध्ये काही गैरसमज आहेत ज्यांचे सत्य जाणून घेणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, कुटुंबातील एखाद्याला स्तनाचा कर्करोग झाला असेल, तर पुढच्या पिढीलाही तो होऊ शकतो, चुकीच्या आकाराची ब्रा घातल्याने स्तनाचा कर्करोग होऊ शकतो किंवा धूम्रपान किंवा तंबाखूचे सेवन हे स्तनाच्या कर्करोगाशी निगडीत आहे. चुकीच्या आकाराची ब्रा घातल्याने स्तनाचा कर्करोग होऊ शकतो यावर भाष्य केले असून हि एक अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे.

डॉक्टरांच्या मते, ब्रा घातल्याने स्तनाचा कर्करोग होऊ शकतो, ही केवळ एक अफवा आहे आणि याला कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. स्तनाच्या कर्करोगामागे अनेक कारणे असून ती समजून घेतल्याने यालक्षणे ओळखण्यास आणि कर्करोगावर प्रतिबंध करण्यात मदत होऊ शकते. वय आणि लिंग हे प्रमुख जोखीम घटक आहेत, वृद्ध व्यक्ती आणि स्त्रिया या कर्करोगाला अधिक संवेदनाक्षम असतात. स्तनाच्या कर्करोगाच्या केवळ 1% प्रकरणे पुरुषांमध्ये आढळतात.

स्तनांची तपासणी..Self Breast Examination…

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीप्रमाणे, “स्वत:च स्तनांची तपासणी केल्याने स्तनांच्या कॅन्सरचं निदान लवकर होण्यास मदत मिळते.”प्रत्येक महिलेने मुलीने घरीच ब्रेस्ट चेक करणे आवश्यक आहे.तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, स्तनांची तपासणी यावेळी करावी…

  • मासिक पाळीनंतर चार-पाच दिवसांनी करावी.
  • स्तन सॉफ्ट किंवा मऊ असताना करावी.

जेणेकरून स्तनांची तपासणी योग्य पद्धतीने होऊ शकते
स्तनांच्या तपासणीसाठी फक्त तीन ते पाच मिनिटं वेळ लागतो. मासिक पाळी सुरू असलेल्या महिलांनी, पाचव्या किंवा सहाव्या दिवशी. तर मासिक पाळी बंद झालेल्यांनी महिन्यातून एकदा ब्रेस्ट तपासणी करणं आवश्यक आहे.

स्वत:च्या स्तनांची तपासणी कशी करायची?

स्तनांची तपासणी करण्याचे दोन प्रकार आहेत. आरशासमोर उभं राहून किंवा झोपून आपण स्तनांची तपासणी करू शकतो.

डॉ. अंजली चव्हाण यांनी ‘Self-Breast Examination’ कशी करायची याची माहिती दिली.

  • स्तनांचा आकार, रंग बदलला आहे का हे पहाणे.
  • स्तनांना सूज येणं, स्तन लाल होणे, व्रण आले आहेत का याकडे लक्ष द्या.
  • स्तनाग्रांची (निपल) जागा बदलली आहे का हे पाहा?
  • निपल आतील बाजूस गेले असतील तर लक्ष देणं गरजेचं आहे.
  • निपलमधून पाणी, रक्त किंवा पिवळ्या रंगाचा पदार्थ येतो का याकडे लक्ष ठेवा.
  • हाताच्या तीन बोटांनी स्तनांच्या वर, खाली, डाव्या-उजव्या बाजूला आणि त्यानंतर गोलाकार पद्धतीने पूर्ण स्तनांवर हात फिरवून पाहा
  • तीन बोटांच्या मदतीने काखेत हळूवार दाब द्या.

तर मासिक पाळी बंद झालेल्यांनी महिन्यातून एकदा ब्रेस्ट तपासणी करणं आवश्यक आहे.मी करते Self-Breast Examination आपणही करा…

Self-Breast Examination च्या फायद्याचं उदाहरण देताना डॉ. अंजली चव्हाण सांगतात, “एका 22 वर्षीय तरूणीला घरच्या घरी ‘सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन’ नंतर हाताला गाठ लागली. ही गाठ साधी असेल म्हणून तिने दुर्लक्ष केलं. पण, गाठ वाढल्यानंतर रूग्णालयात आली. तपासणीत ही गाठ कॅन्सरची असल्याचं निदान झालं.”

पुरुषांना होऊ शकतो ब्रेस्ट कॅन्सर?

महिलांच्या तुलनेत पुरुषांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याचं प्रमाण कमी आहे. फक्त महिलांनी नाही तर पुरूषांनीसुद्धा ‘Self-Breast Examination केलं पाहिजे.
गेल्या काही वर्षांपासून पुरुषांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढताना पाहायला मिळतंय. त्यामुळे पुरुषांनी ब्रेस्ट तपासणी करणं शिकलं पाहिजे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button