India

Parenting Tips : मुले मोठी होतायत.. ह्या गोष्टी त्यांना शिकवाच….

Parenting Tips : मुले मोठी होतायत.. ह्या गोष्टी त्यांना शिकवाच….

नमस्कार वाचकहो… मी समुपदेशक म्हणून आणि शिक्षिका म्हणून गेली 27 वर्षे कार्य करत आहे. या सर्व प्रवासात अनुभव आणि प्रात्यक्षिक मोठ्या प्रमाणात मिळाले असून समुपदेशक म्हणून अतिशय चांगल काम गेल्या 25 वर्षात झालं आहे. हल्ली मुलांना समजून घेणं आणि त्यांना समजावून सांगणं तस कठीण झालंय.. पण आपण एक पालक आपल्या काही जबाबदाऱ्या आणि कर्तव्य आहेत. जागतिक पातळीवर सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात स्पर्धा वाढलीय आणि आपली मुले कुठेही कमी पडू नये ही प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते. हल्लीची मुलं फार सेन्सिटिव्ह असून त्यांची सहनशीलता खूप कमी झाली आहे.घरात योग्य वातावरण असेल तर ते नक्कीच तुमच्याशी सर्व शेअर करतील.पण तस नसेल तर कोणतेही टोकाचे पाऊल उचलून गुन्हेगारीकडे वळून, व्यसनाच्या आहारी जाऊन, चुकीच्या संगतीत राहून आयुष्य खराब करून टाकतील. या अनुषंगाने आपण Parenting Tips हे सदर सुरू करत आहोत. ह्यात लहान मुलांचे संगोपन, टिन एजर मुले मुलींच्या बाबतीत घ्यावयाची काळजी, त्यांना समजावून सांगायच्या आवश्यक बाबी, सेक्स संदर्भातील आवश्यक माहिती, अवयवांची माहिती अश्या विविध विषयांवर माहिती मी देणार आहे. तेंव्हा अजिबात काळजी करू नका आणि तुम्हाला दिली जाणारी माहिती आपले मित्र परिवार नातेवाईक यांच्या पर्यंत जरूर पोहचवा….

मुलांचे पालनपोषण करणं हे नक्कीच लहानमोठं काम नाही. मुलांना योग्य शिक्षण आणि संस्कार देण्यात पालकांचं संपूर्ण आयुष्य निघून जातं. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आपल्या मुलीला काही गोष्टींचं ज्ञान आणि शिकवण लहानपणापासूनच द्यायला हवी.जगातील कोणत्याही शाळेत, कॉलेजमध्ये या गोष्टी शिकवल्या जात नाहीत मात्र आपले संस्कार आणि आपल्या चांगल्यासाठी या गोष्टी प्रत्येक पाल्याने शिकायलाच हव्यात. साधारण १० वर्षांची मुल झाली की त्यांना अनेक गोष्टी कळू लागतात आणि त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यसाठी काही गोष्टींची समज आणि शिकवण देणे हे पालकांचे आद्यकर्तव्य आहे. हे काही महत्त्वाचे मुद्दे असून प्रत्येक पालकांनी हे फॉलो करावेत.

Hygiene अत्यंत आवश्यक

शरीर असो वा जागा हायजीन अर्थात स्वच्छता राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. लहानपणापासूनच पाल्यांना शिकवले तर मोठेपणी ती याचे योग्य पालन करू शकतात. आपल्या मुलांना वैयक्तिक स्वच्छता कशी असावी याबाबत आईने शिकवण द्यावी. लहान वयातच मुले शिकली तर अधिक चांगल्या पद्धतीने स्वच्छता हाताळू शकतात.

स्वतःचे कपडे धुणे

मुलगी असो वा मुलगा आपले स्वतःचे कपडे धुणे हे प्रत्येकाला येणं गरजेचे आहे. ही काही शिकवायची गोष्ट नाही असं म्हणून अजिबात पालकांनी दुर्लक्ष करू नये. सध्या वॉशिंग मशीनचा वापर जास्त होतो मात्र आपल्या पाल्यांना आपली अंतर्वस्त्र स्वतः धुण्याबाबत शिकवण द्यावी. एका विशिष्ट वयानंतर याचे शिक्षण देऊन इतर कपड्यांसह अंतर्वस्त्र का धुऊ नयेत याबाबत माहिती द्यावी.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button