AmalnerMaharashtra

महत्त्वपूर्ण काम असल्यास घराबाहेर पडावे अन्यथा घरीच रहावे तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांचे तालुक्यातील जनतेला आवाहन

महत्त्वपूर्ण काम असल्यास घराबाहेर पडावे अन्यथा घरीच रहावे तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांचे तालुक्यातील जनतेला आवाहन

अमळनेर प्रतिनिधी
कोरोना या विषाणूंचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्याकरीता जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांच्या आदेशानुसार तालुक्यातील जनतेला अमळनेर तालुक्याचे तहसीलदार मिलींदकुमार वाघ यांनी एका पत्रकाद्वारे नियमाचे पालन करावे असे आदेशात म्हटले आहे. वरील आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या नागरीकावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पत्रात नमूद केले आहे.

1. मा. जिल्हाधिकारी जळगाव यांचे कडील आदेश क्र.दंडप्र-01/कावि/2020/55

दि.22/03/2020 अन्वये जळगाव जिल्हयातील सर्व नागरी भागामध्ये दि.23/03/2020
दि.31/03/2020 या कालावधीमध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 चे
आदेश लागु करणेत आलेले आहे.

2. सदर आदेशानुसार फक्त अत्यावश्यक सेवा वगळून अन्य सर्व सेवा बंद राहतील व
खाजगी व सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतील असे
सर्व ठिकाणास मनाई करणेत आलेले आहे.

3. तसेच मा. जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडील आदेश क्र.दंडप्र01/कावि/2020/56
दि.22/03/2020 चे आदेशानुसार जळगाव जिल्हयातील सर्व उदयोग / कारखाने /
कंपनी व तत्सम आस्थापना दि.23/03/2020 ते दि.31/03/2020 पावेतो पुर्णपणे बंद
करणेबाबत आदेशीत करणेत आलेले आहे.

4. सदर आदेशानुसार औषधी दुकाने, सॅनिटायझर, साबन, जंतूनाशके, हॅन्डवॉश तयार
करणाऱ्या कम्पनी, भाजीपाला, फळांची दुकाने, किराणा दुकाने व इतर जिवनावश्यक
वस्तुंची दुकानेच सुरु राहतील व अन्य सर्व दुकाने उघडण्यास सक्त मनाई करणेत
आलेली आहे.

5. अमळनेर तालुक्यातील गरोरद माता, लहान बालक, वयोवृध्द महिला व पुरुष यांनी
कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडु नये अत्यंत आवश्यक असल्यासच घराबाहेर
पडावे.

6. सर्व धार्मिक स्थळे येथे मंदीरात दर्शन, नमाज पठण करण्यास बंदी असून घरामध्येच
सदर प्राथना करणेबाबत निर्देश असल्याने प्राथना स्थळावर गर्दी करण्यास बंदी आहे.

7. जे नागरीक अमळनेर तालुक्यामध्ये बाहेर गावावरुन (पुणे, मुंबई व अन्य ठिकाणावरुन)
आलेले असतील अशांनी 14 दिवस घरच्या घरीच विलिगीकरण करावे जेणेकरुन
आपणास व आपणामुळे अन्य व्यक्तीस त्रास होणार नाही.

8. तसेच गावामध्ये जे नागरीक बाहेर गावावरुन (पुणे, मुंबई व अन्य ठिकाणावरुन) आले
असतील अशांना गावातील आशा वर्कस यांनी 14 दिवस त्यांची देखरेख करावी व त्यांना
सर्दी, खोकला, ताप अशा प्रकारचे लक्षणे आढळुन आल्यास तात्काळ ग्रामीण रुग्णालय
अमळनेर येथे दाखल करावे.

9. तसेच अमळेनर तालुक्यातील सर्व नागरीकांना कळकळीची विनंती करणेत येते की,कोरोना सारख्या विषाणु पासुन बचाव करणेकामी आपले अत्यंत महत्वाचे काम
असल्यासच घराचे बाहेर पडावे अन्यथा कोणीही घराचे बाहेर पडु नये,

असे आवाहन अमळनेरचे तहसीलदार मिलींदकुमार वाघ यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.सर्वानी काळजी घेण्याबातचे गांभीर्य लक्षात घ्यावे व सर्वांनी सहकार्य करावे हे सर्वांचे हिताचे आहे. असे जाहीर आवाहन देखील त्यांनी केलेले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button