Maharashtra

अनंतशांती आणी फिरंगोजी शिंदे संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त गिरगावात ज्येष्ठ गुरुंचा सत्कार

अनंतशांती आणी फिरंगोजी शिंदे संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त गिरगावात ज्येष्ठ गुरुंचा सत्कार

कोल्हापूर आनिल पाटील

गुरु पोर्णिमा म्हनजे व्यास पोर्णिमा दिवशी ओम नमो स्तुते व्यास विशाल बुधे आशि प्रार्थना करुन प्रथम गुरुंना वंद करण्याची परंपरा आहे. आपल्या देशात रामायण महाभारत या काळा पासुन गुरु शिष्य परंपरा चालत आली आहे. आपले ज्यांच्या कडुन विद्या प्राप्त करतो किंवा मिळवतो त्याच विद्येच्या बळावर आपण सर्वांचा उद्धार करत असतो. अशा गुरुंना मान देणे ते प्रत्येक शिष्याचे आद्यकर्तव्य असते. आपण कोणाचे शिष्य आहोत या भावनेत स्वताला एक क्रुतज्ञता वाटते.भारतीय गुरु परंपरेत शुक्राचार्य जनक सुदामा सांदिपणी विश्वमिञ राम विश्वमिञ लक्षम परशुराम कर्ण द्रोणाचार्य अर्जुन अशी विविध जोड्यांची गुरु शिष्य परंपरा आहे. माञ एकलव्याची गुरु निष्ठा पाहिली की सर्वांचेच मस्तक नम्र झाल्या शिवाय राहवत नाही. गुरु पौर्णिमा हि सदगुरुंची पौर्णिमा आहे. पौर्णिमा म्हणजे प्रकाश, गुरु शिष्याला ज्ञान देतात तो ज्ञानाचा प्रकाश आपल्या पर्यंत पोहचवावा म्हनुन गुरुंची प्रार्थना करण्याचा हाच तो सुंदर दिवस. गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर. या सागरातील पाणी विपुल आहे परंतु ते घागरीने भरण्यासाठी मानखाली केल्याशिवाय म्हनजेच विनम्र झाल्या शिवाय पाणी मिळु शकत नाही. त्यामुळे गुरु जवळ शिष्याने नम्र झाल्या शिवाय त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही. या उद्देशाने फिरंगोजी शिंदे व अनंतशांती संस्थेच्या वतीने लाखो विद्यार्थी घडवलेल्या अशा अनेक गुरुंचा सत्कार गुरु पौर्णिमा निमित्य करण्यात आला. गेली कैक वर्षे मर्दानी कला जोपासत नव्या पिढीकडे सुपूर्द करत आजही वेळोवेळी या कलेसाठी योगदान देणाऱ्या वस्ताद आनंदराव पाटील, बाजीराव पाटील,पांडुरंग सासणे, संभाजी जाधव,संभाजी चव्हाण, यशवंत साळोखे या ज्येष्ठ गुरुवर्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी सैनिक सुभाष पाटील, भगवानराव गुरव, वस्ताद प्रमोद पाटील, तुषार पाटील,लक्ष्मण जाधव,दशरथ जाधव, कृष्णात सरनाईक, किसन जाधव, विश्वजीत पाटील, सानिका पाटील, अनुज पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

आभार अनंत शांती बहूऊद्देशीय संस्थेचे अध्यक्ष भगवान गूरव यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button