Amalner

पवन भगवान पाटील,माध्यमिक शिक्षक यांची मास्टर ट्रेनर म्हणून निवड

पवन भगवान पाटील,माध्यमिक शिक्षक यांची मास्टर ट्रेनर म्हणून निवड

नूरखान

प्रगणे डांगरी येथील रहिवासी श्री. आबासो भगवान चौतमल माजी प्राचार्य मारवड यांचे जेष्ठ चिरंजीव श्री पवन भगवान पाटील (माध्यमिक शिक्षक,शासकीय माध्यमिक आश्रम शाळा गोकुळ गाव तालुका शहापूर जिल्हा ठाणे ) यांची SCERT PUNE आणि आयआयटी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गणित विषयाचे राज्यस्तरीय मास्टर ट्रेनर ट्रेनिंग यशस्वीरित्या पुर्ण केले. सदर प्रशिक्षणासाठी 14 जुलै 2018 रोजी ठाणे जिल्हातुन 450 शिक्षकांनी परिक्षा दिली होती त्यात ठाणे जिल्ह्यातून सहा शिक्षकाची निवड करण्यात आली.

पवन भगवान पाटील,माध्यमिक शिक्षक यांची मास्टर ट्रेनर म्हणून निवड

संपूर्ण महाराष्ट्रातून या प्रशिक्षणासाठी 250 शिक्षकांची निवड झाली होती . दोन वर्षाचे प्रशिक्षणानंतर सहा जुलै 2020 ला अंतिम परीक्षा होऊन त्यात श्री.पवन भगवान पाटील यांनी परिक्षेत यश मिळाले व त्यांना SCERT PUNE आणि आयआयटी मुंबई यांच्यातर्फे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या ह्या यशा बद्दल डांगरी ग्रामस्थ, नगाव खु सरपंच सौ. प्रेरणा बोरसे यांनी अभिनंदन केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button