Jalana

पागंरखेडा ग्रामपंचायत सरपंचपदी सौ.सुमनबाई माळी उपसरपंच पदी सुदाम लांडे यांची बिनविरोध निवड

पागंरखेडा ग्रामपंचायत सरपंचपदी सौ.सुमनबाई माळी उपसरपंच पदी सुदाम लांडे यांची बिनविरोध निवड

अंबड : तालुक्यातील पागंरखेडा ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच पदाची आज निवडणूक पार पडली.सरपंच म्हणून जय हनुमान ग्रामविकास पॅनलच्या सौ.सुमनबाई माळी व उपसरपंच म्हणून सुदाम लांडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली
निवडणूक अधिकारी म्हणून ए. ए.चव्हाण यांनी काम पाहीले त्यांना ग्रामसेवक एन. एल. सोळंके तलाठी डी. सी. गायकवाड यांनी सहकार्य केले सरपंच उपसरपंच निवडी नंतर फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी बाबासाहेब धुपे.गोपीनाथ कोल्हे,घनश्याम कोल्हे,सखाराम माळी,श्रीराम कान्हे, भानुदास लांडे,वैजनाथ लांडगे, देविदास माळी,रखमाजी कान्हे,हरीभाऊ कोल्हे,सखाराम लांडगे ,संजय तारगे,शरद कान्हे,नामदेव कोल्हे,राजु धुपे,मनोहर मिरकड,दत्ता कोल्हे,किशोर लांडे,ज्ञानेश्वर कोल्हे,बडुं धुपे,अशोक ठुले,भरत कान्हे,यासह आदी ग्रामस्थांनी अभिनंदन केले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button