Amalner

मंगरूळ येथील तलाव भरला तुडूंब, गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद वाहतोय ओसंडून..

मंगरूळ येथील तलाव भरला तुडूंब, गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद वाहतोय ओसंडून.. 

मंगरूळ येथील तलाव भरला तुडूंब, गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद वाहतोय ओसंडून..

    माजी सरपंच स्व,अनिल अंबर पाटील यांचे स्वप्नं झाले साकार.
अमळनेर( प्रतिनिधी )   यावर्षी झालेल्या समाधान कारक पावसामुळे मंगरूळ येथील तलाव तुडुंब भरून वाहत आहे.
       पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावला असुन,तसेच शेती चे उत्पन्न सुध्दा वाढणार आहे.
   मंगरूळ चे माजी सरपंच स्व अनिल अंबर पाटील यांनी जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत व विविध शासकीय योजना राबवून तसेच लोक सहभागातून
  गेल्या ५ वर्षात  तलाव खोलीकरण करून  अनेक नाले या तलावाला मिळवून दिले,त्याचीच फलश्रुती म्हणून पावसाळ्यात तलाव तुडूंब भरून ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे.
      या ठिकाणी श्रीकांत अनिल पाटील  यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.
      मंगरूळ सहपरिसरातील अनेक गावांसाठी जलसंजीवणी देणारा हा तलाव असणार आहे. तलावाचे पात्र पूर्वी खूपच लहान असल्याने पाणी  साचण्याचे प्रमाण खुप कमी होते त्यामुळे गावाला पाणी पुरवठा करतांना येणाऱ्या अडचणीची स्व अनिल पाटील यांना जाणीव होती
 त्यामुळे  त्यांनी ग्रामस्थांना मोठया प्रमाणात येणाऱ्या तीव्र पाणी टंचाई वर कायमस्वरूपी मात करण्यासाठी  दूरदृष्टी ठेवून तलाव खोलीकरणाचे काम त्यांनी हाती घेतले व
आज त्यांचे स्वप्न साकार झाले आहे.परिसरातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
खोलीकरणामुळे तलाव जलमय झाल्याने गावासह परिसरातील शेती सिंचनाचा व पिण्याचा प्रश्न सोडवण्यात माजी सरपंच स्व अनिल अंबर पाटील यांच्या प्रयत्ना यश आले आहे.यामुळे ग्रामिण जनतेसह शेतकरी बांधवांकडून त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली,यावेळी तलावावर    गावकऱ्यांनी नारळ अर्पण केले.याप्रसंगी प्रा संदीप पाटील,भाईदास पाटील, हिरालाल पाटील, कैलास कुंभार, अरुण घोलप,विठ्ठल पाटील, रामलाल पाटील, विश्वास पाटील, अंकित पाटील, निलेश बागुल, पांडुरंग बागुल, अनिल पाटील, अमोल पाटील, भटू पाटील,चुणीलाल पाटील, आधार पाटील, समाधान पारधी,यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button