Kolhapur

कोल्हापूर जिल्हा जुनी पेन्शन हक्क संघटन जिल्हा कार्यकारिणी बैठक संपन्न.

कोल्हापूर जिल्हा जुनी पेन्शन हक्क संघटन जिल्हा कार्यकारिणी बैठक संपन्न.

सुभाष भोसले,कोल्हापूर
शनिवार 9 नोव्हेंबर 2019 रोजी कागल याठिकाणी कोल्हापूर जिल्हा जुनी पेन्शन हक्क संघटन ची पार पडली या मिटींगमध्ये पदवीधर नोंदणी संदर्भात अनेक तालुक्यात अत्यंत कौतुकास्पद काम झालेल्या शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच जानेवारी 2020 पासून चालू होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यात पूर्ण नियोजनाने नोंदणी कार्य हाती घेण्याचा सर्व पदाधिकाऱ्यांनी निर्धार केला.पगार, डीसीपीएस पावत्या, एनपीएस फॉर्म. बाबत लवकरच जिल्हा स्तरावर सर्व ताकदीनिशी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. माध्यमिक विभागात 700 बांधवांची पदवीधर नोंदणी केल्याबद्दल माध्यमिक प्रतिनिधी सुभाष भोसले यांचा सत्कार करण्यात आला.प्राथमिक शिक्षक बँक निवडणुकीसंदर्भात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. याबाबत चर्चा करणेत आली या मिटींगला राज्यकार्याध्यक्ष सर्जेराव सुतार,संदिप पाडळकर राज्य सह कोषाध्यक्ष,सरचिंटणीस तुषार पाटील,विकास पाटील ,जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे,जिल्हाकार्याध्यक्ष राहूल कांबळे,स्वप्नील सांगले,गजानन कुंभार,सचिन गाडेकर,रणजीत जठार,विजय रामाने,धनाजी पोफले,सतोष जुगळे,चंद्रकांत शिरोळे,अजित माने,सागर कांबळे,अमोल कोळी व सर्व तालुक्याचे तालुकाध्यक्ष व कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button