Bhadgaw

आज आणखी सात कोरोना बाधित रुग्ण आढळले

आज आणखी सात कोरोना बाधित रुग्ण आढळले

रजनीकांत पाटील

प्रतिनिधी : शहरातील आधीच्या पॉझीटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील 20 मे रोजी 190 संशयित रुग्णांचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला होता. त्यापैकी 120 रुग्णांचा अहवाल कालच निगेटिव्ह आला असुन त्यातले 70 रुग्णांचा अहवाल प्रलंबित होता. त्यानतंर दि. 24 व 26 पर्यंत 42 सशंयित रुग्णांचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला आहे. असे एकुण 112 सशंयित रुग्णांचा अहवाल अप्राप्त असुन त्यापैकी 41 रुग्णांचा अहवाल आला असुन त्यात भडगांव शहरातील आज आणखी 7 कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण आढळल्याची धक्कादायक बातमी समोर येते. यात भडगांव शहरातील आधीच्या कोरोना पॉझीटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील शनी चौक-2 कासार गल्ली- 3 इ.2 असे एकुण 7 रुग्ण कोरोना पॉझीटिव्ह आल्याची बातमी वैदयकिय सुत्राकडुन मिळाली आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 499 इतकी झाली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button