Bhadgaw

भडगांव तालुक्यात बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना सावध करण्यासाठी कृषी विभागामार्फत जनजागृती मोहिम सुरू

भडगांव तालुक्यात बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना सावध करण्यासाठी कृषी विभागामार्फत जनजागृती मोहिम सुरू

भडगाव तालुक्यातील जवळच असलेले भोरटेक बु.येथे बोंडअळीच्या नियंत्रणासाठी महाराष्ट्र शासना कृषी विभाग व रासी सिड्स याच्या संयुक्त विद्यमानाने
भडगाव तालुक्यात २५,००० हेक्टरवर कपाशीची लागवड केली असून कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना सावध करण्यासाठी कृषी विभागामार्फत जनजागृती मोहिमेस १ ऑगस्ट पासून प्रारंभ झाला असून त्यात भोरटेक बु., उमरखेड गावात महाराष्ट्र शासन कृषी विभाग व रासी सिड्स यांच्या संयुक्त विद्यामानाने कपाशी वर बोडअळीच्या नियंत्रण विषयी मोहीम योजना करण्यासाठी चित्रं रथाचे आयोजन करून शेतकरी गाव बैठक घेण्यात आली.गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊन मोठया प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता कृषी विभागाला धोका जाणवू लागला आहे. म्हणून सिड्स च्या सहकार्याने महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत जनजागृती मोहीम सुरू झाली आहे, शेतकऱ्यांना सदर मार्गदर्शक सूचना करण्यात आली असून सदर प्रसंगी मा.उपविभागीय कृषी अधिकारी श्री. नंदकिशोर नाईनवाड यांनी सेंद्रिय शेती व जैविक किड नियंत्रण बाबत मार्गदर्शन केले, तालुका कृषी अधिकारी श्री. बी. बी. गोर्डे यांनी भौतिक पद्धतीने कीड नियंत्रण ठेवण्यासाठी चिकट सापडे शास्त्रीय पद्धतीने फेरोमेन ड्रॉप चा वापर पक्षी, थांबे इ.चा वापर करून रस शोषण करायण्याची कीड व गुलाबी बोंडअळी नियंत्रण करणे याचे मार्गदर्शन केले.
राशी सिड्स चे विभागीय व्यवस्थापक श्री. समाधान खैरनार यांनी रासायनिक कीटकनाशके फवारणी करतांना फवारणी किट वापरून शेतकऱ्यांनी फवारणी करावी. यासाठी कामगंध सापडे कृषी विभागा मार्फत शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले तसेच ५०% निंबोळी आर्क, ५ लिटर रु.१०० या कमी दरात उपलब्ध करून देण्यात आली आहे. कृषी विभागामार्फत पातळी ओलांडलेल्या गावांना किनॉल फॉस २५% इ सी हे कीटकनाशके ५०% अनुदानावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. भोरटेक चे प्रगतीशील शेतकरी संजय महाजन यांनी सेंद्रिय शेती व जैविक कीड नियंत्रणाविषयी स्वतःचे अनुभव सांगितले.
जनजागृती मेळाव्यात सरपंच उमेश देशमुख, प्रगतिशील शेतकरी अशोक देशमुख, सुनील महाजन, नगराज पाटील, व इतर शेतकरी, कृषी सहायक सचिन पाटील, कृषी सहायक सुखदेव गिरी तसेच महिला, शेतकरी वर्ग उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button