Bhadgaw

भडगाव ते वलवाडी रस्त्यावर खड्डा की खड्ड्यात रस्ता…. ग्रामस्थांनी दिला चक्काजाम आंदोलनाचा ईशारा…. सा.बां.विभागाला दिले उपोषणाचे निवेदन….

भडगाव ते वलवाडी रस्त्यावर खड्डा की खड्ड्यात रस्ता…. ग्रामस्थांनी दिला चक्काजाम आंदोलनाचा ईशारा…. सा.बां.विभागाला दिले उपोषणाचे निवेदन….

रजनीकांत पाटील

भडगाव – तालुक्यातील वलवाडी रस्ता हा अत्यंत खराब झाला असून त्यावर मोठ मोठे खड्डे पडलेले आहे. या मुळे वाहन धारकांना मोठी कसरत करून वाहन चालवणे अवघड होत असून या रस्त्यावर केव्हाही मोठा अपघात घडू शकतो या मुळे रस्ता त्वरित दुरुस्ती करावा अन्यथा चक्काजाम करून आमरण उपोषण करण्यात येईल असे निवेदन वलवाडी ग्रामस्थांनी आज सार्वजनिक बांधकाम विभाग भडगाव विभाग यांना देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, राज्यमार्ग क्रमांक 48 वलवाडी ते भडगाव रस्ता अत्यंत खराब झालेला असून तात्काळ काम करण्यात यावे कारण संबंधित ठेकेदाराने पाच ते सहा महिन्यापासून जे.सी.बी.च्या सहाय्याने मोठमोठे खड्डे करून डबर दगड-गोटे मुरूम न टाकता ठीकठिकाणी टाकून ठेवले आहेत त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होऊन वाहतूकदारांच्या जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही रात्रीच्या वेळेस अचानक गाडी आल्यास मोटरसायकलचा अपघाताचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे म्हणून सदर रस्त्याचे काम जलदगतीने करण्यात यावे अशी गावातील व परिसरातील नागरिकांची मागणी आहे सदर रस्त्याने जाताना संपूर्ण रस्ता खड्डेमय झाल्याने खड्ड्याच्या अंदाज येत नाही म्हणून हे निवेदन दिल्यापासून पाच ते सहा दिवसाच्या आत रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू न झाल्यास आम्ही गावातील सर्व ग्रामस्थांसह चक्काजाम करून उपोषणास बसू यात कमी-जास्त झाल्यास होणाऱ्या परिणामास आपण सर्वस्वी जबाबदार रहाल असे निवेदन देण्यात आले आहे निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी जळगाव,अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव,उपविभाग पाचोरा,तहसीलदार भडगाव,पोलीस निरीक्षक भडगाव यांना दिल्या आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button