Maharashtra

आदिवासी युवती अत्याचार प्रकरण; आदिवासी समाजाचा मोर्चा अत्याचार करणारा डॉक्टर मोकाटच

आदिवासी युवती अत्याचार प्रकरण;
आदिवासी समाजाचा मोर्चा
अत्याचार करणारा डॉक्टर मोकाटच

(किनवट/प्रतिनिधी) येथील डॉक्टर नागरगोजे याने पोलिस प्रशिक्षणात प्रशिक्षण घेणाऱ्या युवतीला नागरगोजे हॉस्पिटलमध्ये त्वचेच्या विकारावर उपचार घेत असणाऱ्या युवतीसोबत अश्लील चाळे करून विनयभंग केल्यानंतर 15 फेब्रु. 2020 रोजी गुन्हा दाखल झाला, परंतु आजपर्यंत आरोपी डॉक्टर नागरगोजे यास अटक का केली नाही म्हणून दि. 5 मार्च 2020 रोजी आदिवासी समाजाचा सहाय्यक जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी 11 वा. मोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे.

याबाबतचा सविस्तर वृत्तांत असा की गुन्हा दाखल होऊन जवळपास वीस दिवस उलटूनही आरोपी डॉक्टरला अटक का करण्यात आली नाही; गुन्हा दाखल करण्यास गेलेल्या पिडीतेस अकरा तास बसवून तिचा गुन्हा दाखल करण्यात आला, हा गुन्हा दाखल करण्यास विलंब का लावला, आणि अटक न झालेला डॉक्टर नागरगोजे राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या संबंधित असल्याचे कारण ही आपल्या पत्रकात नमूद करून संताप व्यक्त करण्यात आलेला आहे.

याच युवतीला पोलीस अधिकारी मंदार नाईक यांनी संपूर्ण बाजारभर आणि रहदारीच्या ठिकाणी तपासकामी पायी फिरवून अपमानित केल्याने आदिवासी संघटनांनी आवाज उठविला होता .त्यानंतर मंदार नाईक यांची सहाय्यक पोलिस अधिक्षक भोकर यांच्याकरवी चौकशी सुद्धा झाली होती. आणि तडकाफडकी त्यांच्याकडील हा तपास काढून माहूर डीवायएसपी यांच्याकडे सोपविला आहे. दिनांक 5 मार्च रोजी आयोजित मोर्चामध्ये बीरसा ब्रिगेड,मूळ आदिवासी समाज संघटना, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, आदिवासी विद्यार्थी समिती यासह अनेक संघटना आणि समाज बांधवांचा या मोर्चामध्ये समावेश असणार आहे नागपूर,मुंबई आणि दिल्ली दरबारी प्रत्यक्ष शिष्टमंडळ भेटून देखील या प्रकरणात गांभीर्याने कार्यवाही होत नसल्याची खंत आदिवासी समाजाने बोलून दाखविली आहे. तर यात राजकीय हस्तक्षेप होत असल्याची सुद्धा संतापजनक प्रतिक्रिया संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान किनवट माहूर मतदार संघाचे आमदार भीमराव केराम हे मागील आदिवासी आमदार किशनराव पाचपुते यांच्या सुमारे तीस वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर केराम हे आदिवासींच्या मतावर निवडून आलेले आमदार आहेत, परंतु आजपर्यंत असंख्य आदिवासी मुलींच्या अत्याचाराच्या घटनांचा आवाज दबून राहिलेला आहे. असेही मत व्यक्त करताना संघटना आक्रमक पावित्र्यात आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button