Bhadgaw

कोव्हिडच्या कामकाजातुन शिक्षकांना कार्यमुक्त करावे.भडगांव तहसिलदारांना शिक्षक संघ, मुख्याध्यापक संघाचे निवेदन.

कोव्हिडच्या कामकाजातुन शिक्षकांना कार्यमुक्त करावे.भडगांव तहसिलदारांना शिक्षक संघ, मुख्याध्यापक संघाचे निवेदन

भडगांव ता.प्रतिनिधी रजनीकांत पाटील

भडगांव तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना शासन आदेशानुसार कोव्हिड १९ कामकाजातुन कार्यमुक्त करावे. या मागणीचे निवेदन माध्यमिक शिक्षक संघ,मुख्याध्यापक संघाचे जिल्हा अध्यक्ष-जे.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार रमेश देवकर यांना निवेदन देण्यात आले. तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे कि,शालेय कर्मचार्यांना कोव्हिड १९ काम काजातुन कार्यमुक्त करण्या बाबतचे शासन आदेश झालेले आहेत. शिक्षकांनी विदयार्थ्यांना ऑनलाईन,ऑफलाईन अध्यपना बरोबर वैयक्तीक गृहभेटी देउन अभ्यासाबाबत मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. तसेच या कामकाजासाठी नियुक्त शालेय कर्मचार्यांना गृहविलीगीकरणासाठी पुरेसा कालावधी मिळणे आवश्यक आहे.माध्यमिक शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांना सेवा कोव्हिङ १९ च्या कामकाजासाठी अधिग्रहीत केल्या आहेत. त्यांना कार्यमुक्त करावे असेही शेवटी निवेदनात नमूद केलेले आहे.

यावेळी नायब तहसीलदार रमेश देवकर यांनी वरिष्ठांशी आवश्यक चर्चा करून कोव्हिङ १९ बाबत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कार्यमुक्ती बाबत योग्य तो सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन संघटनांच्या पदाधिाऱ्यांनी दिले. या वेळी१७:०८:२०२०चा शासन परिपत्रक चे ही वाचन करून सूचना क्र.१.४ मध्ये बदल करून माध्यमिक शाळांमधील कार्यरत कर्मचारी यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेशही असल्याचे निदर्शनास आणण्यात आले. या वेळीं जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष आर डी निकम,तालुका आध्यक्ष दिपक बोरसे , सचिव अभिजीत शिसोदे , उपाध्यक्ष वलखंडे , माध्यमिक संघ अध्यक्ष एस आर पाटील, मुख्याध्यापक अरूण बागुल, महेंद्र पाटील आदि उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button