Motha Waghoda

मोठा वाघोदा येथे बसस्टँण्ड परीसर व चिनावल फाट्यावर गतीरोधक बसवण्याची
कमलाकर माळी यांची मागणी…

मोठा वाघोदा येथे बसस्टँण्ड परीसर व चिनावल फाट्यावर गतीरोधक बसवण्याची
कमलाकर माळी यांची मागणी…


प्रतिनिधी : मुबारक तडवी

मोठा वाघोदा : बर्हाणपुर अंकलेश्वर महामार्गावर असलेल्या मोठे वाघोदा येथील बसस्टँण्ड परीसर व चिनावल व निंभोरा फाट्यावर रावेर हायवेवर गतीरोधक बसवण्यात यावा अशी मागणी वाघोदा येथील कमलाकर माळी यांनी केली आहे.हा संपूर्ण परीसर केळीसाठी प्रसिद्ध असल्यामुळे या महामार्गावर वाहनांची वर्दळ खुप असते.तसेच हा हायवे असल्याने वाहने सुसाट धावतात.या हायवेच्या दोन्ही बाजुने गाव असल्याने व ग्रामस्थांची व केळी मजुरांची नेहमी वर्दळ असल्याने. अपघात होण्याची शक्यता जास्त आहे. आताच काही दिवसांपूर्वी गावाजवळ अपघात झाला होता.चिनावल तसेच निंभोरा या गावावरून येणाऱ्या वाहनांची गती कमी असली तरी गावाच्या दोन्ही बाजुने गतीरोधक नसल्याचे वाहने सुसाट धावतात.गावाजवळ एकही गतीरोधक नसल्याने वाहन धारक गती कमी करत नाही. त्यामुळे गावाजवळ दोन किंवा तीन तरी गतीरोधक असणे गरजेचे आहे. बसस्टँण्ड परीसरात असे किरकोळ अपघात भरपूर झाले आहेत.पण वाहणांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या पाहता वाहने सुसाट धावत आहे. या परीसरात काही मोठी दुर्घटना झाल्यास यास जबाबदार कोण ? असा प्रश्न चिन्ह निर्माण होतात.तरी संबंधित अधिकार्यांनी याकडे लक्ष देऊन बसस्टँण्ड परीसर व चिनावल फाटा परीसरात गतीरोधक बसवावे अशी मागणी कमलाकर माळी यांनी केली आहे.तसेच लवकरच या आशयाचे निवेदन ही सामाजीक.बाधकाम विभागाकडे देणार असल्याचे ते सांगत आहे..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button