Pune

पवार टोळीवर इंदापूर पोलिसांनी लावला मोक्का..

पवार टोळीवर इंदापूर पोलिसांनी लावला मोक्का..

दत्ता पारेकर पुणे

पुणे : 2011 पासून इंदापूर परिसरात खुनाचा प्रयत्न, खंडणी मागणे,अवैद्य सावकारी,जबरी चोरी,घरफोडी, मारामारी असे विविध गंभीर गुन्ह्यांमुळे चर्चते असणाऱ्या पवार टोळीवर इंदापूर पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. राहूल बाळासाहेब पवार, गणेश बाळासाहे पवार, पिनेश उर्फ दिनेश उर्फ मयुर महेंद्र धाईंजे,विवेक पांडुरंग शिंदे,सागर नेताजी बाबर यांचेवर आतापर्यंत एकूण 11 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असुन त्यांनी गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी इंदापूर पोलीस निरिक्षक धन्यकुमार गोडसे यांनी पवार टोळीवर मोक्का अंतर्गत कार्यवाही करण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर मनोज लोहीया यांचेकडे प्रस्ताव पाठवला होता,त्यांनी तो मंजूर केला आहे.

सदरची पवार टोळी हि सध्या जेल मध्ये असुन पोलीस निरिक्षक धन्यकुमार गोडसे इंदापूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक ज्ञानेश्वर धनवे,बिरप्पा लातुरे,श्री.धोत्रे, सहाय्यक फौज जगताप (L-C-B),सहा फौजदार श्री.ठोबरे, सहाय्यक फौजदार श्री.तांबे,पो हवालदार दिपक पालके, पोलीस नाईक संजय जाधव,विनोद पवार,श्री.मोहिते,श्री.मोहळे, पो.कॉ.केसकर, पो.कॉ. अमोल गारूडी, विक्रम जमादार, पो. कॉ. मोरे यांनी ही कारवाई केली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे म्हणाले,की इंदापुर पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये राहुल बाळासाहेब पवार, गणेश बाळासाहेब पवार व त्याचे साथीदार हे जवळपास गेले आठ ते दहा वर्षापासुन वेगवेगळे गुन्हे करीत असून त्याचेवर 2011 पासुन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. सन 2011 साली सदर टोळीने लाकडी हॉकीने डोक्यात मारहान करून मोठी दुखापत करून भांडणे केली होती,भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या इतर लोंकाना ही हाताने लाथाबुक्याने मारहान करण्यात आली होती. तर 2014 साली पवार टोळीने नगरपरिषदेसमोर लावलेली एक पियाजो रिक्षाची चोरी केली होती. असे विविध घटनांचे गुन्हे दाखल आहेत.

2015 साली पवार टोळीने बेकायदेशिर जमाव जमवुन गणपती विसर्जन मिरवणुकीचे कारणावरून दंगल करू दगडाने विटाने लाथाबुक्याने तसेच फायटरणे मारामारी करून गोंधळ केला होता, 2016 साली पवार टोळी हि व्यापाऱ्यांना धकावुन दुकान चालवायचे असेल तर आम्हाला पैसे द्यावे लागतील असे म्हणुन खंडणी दिली नाही म्हणुन दुकानाच्या काचा फोडुन दुकानातील गल्ल्यातील पैसे काढुन घेत असले बाबत इंदापूर पोलीसांत गुन्हा दाखल आहे.

2017 साली पवार टोळीने इंदापुर येथील यात्रे मध्ये पाळण्यात बसण्याचे कारणावरून जातीवाचक अपशब्द वापरून गजाने कोयत्याने मारहान करून रिव्हॉलव्हर धाक दाखवत धमकी देवुन दहशत निर्माण केली,लाथा बुक्याने मारहान करून जिवे ठार माण्याचा प्रयत्न केला. 2018 साली पवार टोळीने इंदापुर येथील मेडीकल दुकाने फोडुन घरफोडी चोरी करून मेडीकल दुकानामधील संगणक, रोख रक्कम,मोबाईल हॅन्डसेट तसेच वेगवेगळ्या प्रकारची औषधे चोरी केली आहेत, 2020 साली पवार टोळीने बेकायदेशिर जमाव जमवुन खुनाचा प्रयत्न,कोयत्याने मारहान करून लाकडी दांडक्याने मरहान करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.

सदर पवार टोळीने तारीख 13 मे 2021 रोजी पहाटे साडेपाच वाजताचे दरम्यान पुणे सोलापूर हायवेवर हिंगणगाव गावचे जवळ असनारे सोनाई पेट्रोल पंपाजवळ एका प्रवाशाची लुट केली होती.पवार टोळीवर 11 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असुन त्यांनी असे गुन्हे संघटीतपणे केले असुन कायद्याचा फास आवळण्यासाठी इंदापूर पोलिसांनी पवार टोळीवर मोक्का अंतर्गत कार्यवाही करण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर मनोज लोहीया यांचेकडे पुणे पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख,अपर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनानुसार पवार टोळीवर मोक्का अर्तंगत प्रस्ताव पाठवला होता. सदर मोक्याचा तपास नारायण शिरगावकर उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग, बारामती हे करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button