Bhandardara

भंडारदरा येथील द-याचीवाडी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

भंडारदरा येथील द-याचीवाडी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

भंडारदरा प्रतिनीधी – दिलीप आंबवणे

अकोले तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, द-याचीवाडी (भंडारदरा) येथे भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
पुजन शिक्षक पांडुरंग बारामते यांनी केले तर राघु खाडे यांनी ध्वजारोहन केले. या स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाप्रसंगी शिक्षक मोहन कुसळकर, पांडुरंग बारामते, पुणे जिल्हा आदिवासी साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य तथा बिरसा क्रांती दल पुणे जिल्हा प्रसिध्दीप्रमुख दशरथ खाडे, ग्रामस्थ सोनु खाडे, गणपत दिघे, वसंत खाडे, गणपत खाडे, राजेंद्र खाडे, विजय खाडे आदि.नागरीक उपस्थित होते.

या ध्वजारोहन कार्यक्रमाप्रसंगी शिक्षक पांडुरंग बारामते सर म्हणाले की स्वातंत्र्य दिनाचा आनंदोत्सव साजरा करण्याबरोबरच स्वत:च्या आरोग्याची देखील काळजी घेतली पाहिजे.सध्या कोरोनाचे संकट सुरु असुन त्यावर मात करण्यासाठी मास्क वापरले पाहिजे आणि सुरक्षित अंतर देखील ठेवले पाहिजे.

Leave a Reply

Back to top button