Bhandardara

भंडारदरा परिसरातील पर्यटन व्यवसाकांवर उपाय मारी ची वेळ… शासनाकडून मदतीची अपेक्षा

भंडारदरा परिसरातील पर्यटन व्यवसाकांवर उपाय मारी ची वेळ…
शासनाकडून मदतीची अपेक्षा

तालुक्‍यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. शेजारील ठाणे, मुंबई, नाशिक, पुणे जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. त्यामुळे भंडारदरा, कळसूबाई, हरिश्‍चंद्रगड, घाटघर परिसर पर्यटकांविना सुनासुना झाला आहे. पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेल्या लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
याच पर्यटनावर या ठिकाणचे आदिवासी तरुणांचा व्यवसाय अवलंबून आहे व त्याच्या आवडी निवडी लक्ष्यात घेऊन येथिल तरुणांनी आपले छोटे – मोठे व्यवसाय सुरू केले आहेत .

परंतु कोरोना महामारी मुळे गेले ५ ते ६ महिने झाले पर्यटन बंद असल्याने या ठिकाणचे सर्वच व्यवसाय त्यात प्रामुख्याने टेंट क्यामपिंग ,चहा स्टॉल, मक्का कनिस , मुंभली, जेवणाची सोय, बोटींग , गाइड, इ.व्यवसाय बंद आहेत. आज ना उद्या हा रोग जाईल व पर्यटन चालू होईल या आशेवर भंडारदरा परिसरातील तरुण होते. मात्र हा आजार रोखण्यात अजुन तरी यश आले नसल्याने व या ठिकांच्या आदिवासी समाजाचे आरोग्याच्या समस्या लक्ष्यात घेऊन जवळपास डिसेंबर संपेपर्यंत तरी ते शक्य नसल्यामुळे आणि जवळ होते – नव्हते तेवढे संपल्याने आता या व्यावसायिकांवर उपास मारिची वेळ आली आहे. तेव्हा आम्हाला शासनाने वेळेतच मत करावी नाहीत या ठिकाणचा व्यावसायिक देशोधडीला लागले असे या ठिकाणच्या तरुणांनी सांगितले.

तर आम्ही आमच्या लोकांचे आरोग्य लक्ष्यात घेत व ग्रामपंचायत स्तरावर आदेश देण्यात येत नाही तोपर्यंत व्यवसाय बंद ठेवणार असुन पर्यटकांनी या ठिकाणी येऊ नये असे आवाहन करण्यात आले.
तर शासनाने अजुन काही दिवस या ठिकाणचे पर्यटन बंद ठेवावे करण आज पर्यंत आदिवासी भागात कोरोना रोगाचा शिरकाव झालेला नाही जो झालाय तो बाजार पेठा , लोकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असलेल्या ठिकाणीच झाला आहे तेव्हा शासनाने आदिवासी व गरीब शेतकरी बांधवांना हित लक्ष्यात घेऊन याबाबत ठोस निर्णय घ्यावा असे महाराष्ट्र राज्य पेसा ग्रामपंचायत सरपंच परिषदेचे सचिव पांडुरंग खाडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Back to top button