Bhandardara

भंडारदरा धरण तुडूंब भरले , नदिकाठच्या 83 गावांनो सावधान

भंडारदरा धरण तुडूंब भरले ,नदिकाठच्या 83 गावांनो सावधान

भंडारदरा (प्रतिनिधी) :- विठ्ठल खाडे

गेल्या पंधरा दिवसांत अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला आहे. या परिसरात पावसाने चांगलेच थौमान घातले आहे. त्यामुळे धरणात थेंबथेंब साचून भंडारदरा 11.29 टिएमसी भरले आहे. मात्र, गेल्या काही दिवसापासून रतनवाडी व घाटघर, साम्रद, उडदावणे, पांजरे या पाणलोट क्षेत्रात पावसाने थैमान घातले आहे. येथे तब्बल 83 मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे भंडारदरा पुर्णपणे भरुनही अजुनही पाण्याची आवाक रोज वाढत आहे. त्यामुळे येणारे पाणी आता 816 क्युसेक्स पाणी प्रवरेतून खाली सोडण्यात आले आहे. यावर्षी पावसाने अक्षरश: वाट पहायला लावली आहे. तर आता या पावसामुळे शेत हिरवाईने नटले असून डोंगर दर्‍यांमधून पांढरेशुभ्र धबधबे वाहत असून सह्याद्रीने हिरवा शालू नेसल्याचे दिसत आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून यावर्षी येथे पर्यटनाला बंदी घालण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यासह मराठवाड्यातील एक कोटी लोकांची तहान भागविणारा भंडारदरा धरण तुडूंब भरले. त्यामुळे वर्षभर लाखो शेतकर्‍यांची चिंता स्थिरावली आहे.

तर भंडारदरा, रंधा खुर्द व बुद्रुक, शेलविहीर, माळेगाव, दिगंबर, चितळवेढे, निब्रळ, निळव़डे, विठे, म्हळदेवी, सावंतवाडी, इंदोरी, रुंभोडी, मेहेंदुरी, उंचखडक बु व खुर्द, अकोले, टाकळी, सुगाव खुर्द व बुद्रुक, कळस, तर संगमनेर तालुक्यात दोन्ही धांदरफळ, वाडापूर, रायते, संगमनेर बु व खुर्द, जोर्वे, कणुली, दाढ, कोकणेवाडी, आश्वी, वाघापूर, शेडगाव, खराडी, मंगळापूूर कसारा दुमाला, आश्वी बु, तसेच राहाता तालुक्यात, दाढ, हाणुमंतगाव, पाथरे, दुर्गापूर, कोल्हार भगवती तर श्रीरामपूर तालुक्यात कडीत खुर्द व बुद्रुक मांडवे, कुराणपूर, लाडगाव, भेर्डापूर, मालुंजे, खिर्डी, वागी खुर्द व बुद्रुक, वळदगाव, उंबरगाव, तसेच नेवाशात पाचेगाव, चिंचबन, गोनेगाव, नेवासा खुर्द व बुद्रुक व बहिरवाडी राहुरी तालुक्यात देखील धानोरे, सोनगाव, सात्रळ, माळे डुक्रेवाडी, कोल्हार खु, चिंचोली, दावनगाव आंबी, अंमळनेर, केसापूर, चांदेगाव, ब्राम्हणगाव, बोधेगाव, करंजगाव, मालंजे, दरडगाव, महालगाव, लाख, सांक्रापूर, गंगापूर, पिंपळगाव फुगणी, माहेगाव याची नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाआहे.

Leave a Reply

Back to top button