Amalner

दहिवद येथील तरुणाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू..!गावाची 70 वर्षाची देवकाठी परंपरा रद्द…!

दहिवद येथील तरुणाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू..!गावाची 70 वर्षाची देवकाठी परंपरा रद्द…!

अमळनेर तालुक्यातील दहिवद येथील तरुणाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १४ ऑक्टोबर रोजी घडली. युवकाच्या अकस्मात मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली असून गावाने दसरा सणही साजरा न करता पारंपरिक देवकाठीचा कार्यक्रम रद्द केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील दहिवद-अमळनेर रस्त्यावर १४ तारखेला संध्याकाळी वामन माळी यांच्या शेतसमोर नितीन विठोबा माळी (वय २२) या तरुणाला दुचाकीस्वाराने (क्रमांक एमएच -१८, बीएस ३७९०) वेगात येऊन मागून धडक दिली. नितीनच्या डोक्याला मार लागून त्याचा मृत्यू झाला.सुखदेव मोतीलाल माळी यांनी फिर्यादिवरून अज्ञात चालकविरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास सुनील पाटील करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button