Amalner

Amalner: युवारंग युवक महोत्सवात उपविजेत्या संघाचा खा शि तर्फे सत्कार…

Amalner: युवारंग युवक महोत्सवात उपविजेत्या संघाचा खा शि तर्फे सत्कार…अमळनेर क ब चौधरी विद्यापीठातर्फे झालेल्या युवारंग युवक महोत्सवात ५ सुवर्णपदके ५ रजतपदके, ६ कांस्यपदके प्राप्त झाले. युवारंग स्पर्धेत सर्वसाधारण उपविजेता ठरलेल्या प्रताप महाविद्यालयाच्या कलावंत संघाचा खान्देश शिक्षण मंडळ व प्रताप महाविद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला. एकूण 26 कला प्रकारात 23 कला प्रकारात महाविद्यालयाने सहभाग घेत 16 पदके प्राप्त केली.या वेळी संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र झाबक, उपाध्यक्ष जितेंद्र देशमुख, विश्वस्त वसुंधरा लांडगे, कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे,कार्योपाध्यक्ष प्रदीप अग्रवाल, संचालक योगेश मुंदडे, सीए. नीरज अग्रवाल, बजरंगजी अग्रवाल, चिटणीस तथा प्राचार्य डॉ. ए. बी. जैन, सहचिटणीस डॉ. धीरज वैष्णव, उपप्राचार्य प्रा. डॉ.जी.एच. निकुंभ, प्रा. डॉ. कल्पना पाटील, प्रा. डॉ. जयंत पटवर्धन, प्रा. पराग पाटील, प्रा. डॉ. विजय मांटे, माजी प्राचार्य डॉ. पी. आर. शिरोडे, डॉ. अविनाश जोशी, आयक्युएसी समन्वयक डॉ.मुकेश भोळे,वसतिगृह प्रमुख डॉ. अमित पाटील, प्रा. आर. एम. पारधी, आदी मान्यवर उपस्थित होते. विजेत्या स्पर्धक संघाचे ढोलताशांच्या गजरात फटाके वाजवून स्वागत करण्यात आले.युवारंग समन्वयक प्रा. नितीन पाटील, सह-समन्वयक डॉ. योगेश तोरवणे, संघव्यवस्थापक प्रा. डॉ. तुषार रजाळे, महिला संघव्यवस्थापक: डॉ. नलिनी पाटील यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच उपप्राचार्य प्रा. पराग पाटील, प्रा. डॉ. संदीप नेरकर, ग्रंथपाल डॉ. डी. आर. पाटील, प्रा. डॉ. धनंजय चौधरी, प्रा हेमंत पवार, प्रा. योगेश तोडा, प्रा. अवित पाटील, प्रा. योगेश पाटील, प्रा. किरण भागवत, प्रा. किरण सूर्यवंशी, प्रा. संतोष दिपके, प्रा. एस डी बागूल, प्रा महेंद्र महाजन, प्रा. आकाश पाटील कार्यालयीन अधीक्षक राकेश निळे, कुलसचिव आबासाहेब मैराळे, भटू चौधरी इ. चे सहकार्य लाभले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button