Amalner

Amalner: गळफास घेऊन वयस्कर व्यक्तीची आत्महत्या…

Amalner: गळफास घेऊन वयस्कर व्यक्तीची आत्महत्या…

अमळनेर तालुक्यातील रणाईचे येथे घराच्या छताला दोरी बांधून आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबद्दल सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील रणाईचे येथे आनंदराव राघो सुतार (वय 55 ) यांनी घराच्या छताला दोरी बांधून 13 ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. पांडुरंग सुतार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सहा. पो. उ.नि. संजय पाटील करत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button