Kolhapur

आमदार हसन मुश्रीफ यांनी लाखो उपस्थितांच्या गर्दीत मिरवणुकीने भरला उमेदवारी अर्ज

आमदार हसन मुश्रीफ यांनी लाखो उपस्थितांच्या गर्दीत मिरवणुकीने भरला उमेदवारी अर्ज

कोल्हापूर_ सुभाष भोसले
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लोकगंगेला आलेल्या या महापूरापुढे मी नतमस्तक होऊन, साष्टांग दंडवत घालीत आहे. असे भावनिक प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.

अर्ज भरल्यानंतर लाखोंच्या उपस्थितीत निघालेल्या मिरवणुकीनंतर झालेल्या सभेत बोलताना हसन मुश्रीफ म्हणांले, ही निवडणूक जनतेनेच हातात घेतल्याची प्रचिती आता मला आली आहे. कागल गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघातील जनतेचे हे ॠण या जन्मीच काय, सात जन्मीही फेडू शकत नाही. असेही ते पुढे म्हणाले
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आमदार हसन मुश्रीफ बरोबर साडेदहा वाजता कागल तहसील कार्यालयात पोहोचले. साडेअकरा वाजता श्री. हसन मुश्रीफ यांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्यांच्या समवेत किसनराव कुराडे, प्रवीणसिंह पाटील, वसंतराव धुरे, किरण कदम नितीन दिंडे व सर्व नगरसेवक ही प्रमुख उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button