Jalana

?आभाळाचा स्पर्श..!

?आभाळाचा स्पर्श ..!

संजय कोल्हे जालना

जालना : आजच्या धकाधकीच्या काळात उंच भरारी घेणारे जीवनाची पंख तुटलेले दिसतात, अर्थातच जीवनाच्या विशाल आभाळाकडे बघितले तर असं आढळून येतं की आभाळ वरती, अर्थात स्वप्न वरती आणि पक्षी तुटलेल्या पंखाने खाली. अर्थात ज्ञानाला खाली देखील काही वर्षांपासून बघितलं जाणार. तर ही जीवनाची धकाधकीची गाडी अतिशय वेगाने धावत जात आहे, व्यक्तिगत चित्रण केले तर सर्व स्पर्धेत आहेत, परंतु ती स्पर्धा कसली आहे हे आज पर्यंत कळले नाही.
जीवनाच्या प्रवासामध्ये वय एक ते सव्वीस याच वयोगटांमध्ये शिक्षण घेणार असे आढळून येत नाही. शिक्षण म्हणजे काय तर हेच आढळून येते दहावी बारावी मग तीन प्रकार चे क्षेत्र इंजिनियर डॉक्टर नाहीतर बँक कॉमर्स .एका विशाल दृष्टिकोनातून बघितले तर शिक्षण हेच जीवन आहे. त्यातले काही क्षण जे उच्चवर्गीय असतात जसे की विनम्रतेने मानसन्मान करून भेटलेले पारितोषिक. त्याला शिक्षणाचा धडा असं म्हणले जाणार.
स्वाभाविक पणे बघितले तर मोठे व्यक्ती लहान व्यक्तीला जे शिकवतात की, जे मोठे सुद्धा शिकलेले नसतात, हे हास्य दायक चित्रण दर्शवतात. जीवनाचा मोठा वापर केला तर शिक्षण हेच जीवनाचे लहानपणापासून मोठ्यानपर्यंत एक स्पर्धा आहे.
आपल्या स्वभावाच्या वर्णना नुसार, जीवन म्हणजे शिक्षण केले तर आज आपल्या भारत देशात अनेक प्रकारचे संशोधन निर्माण होतील. जीवनात झोपणे आणि खाणे हे अशिक्षित स्वरूपाचा रूप म्हणता येणार. जरी तुम्ही पैसे अपरंपार कमवत असाल पण त्याच जीवन जर एका मोठा लक्षन आढळला तर तेच शिक्षण या भारत देशाच्या नाही तर संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी उपयोगी ठरेल आणि कल्याण करताना मान-सन्मान हे स्वभावाच्या स्वरूपात सोबत असतं.त्यामुळे जीवनाचा अर्थात शिक्षणाचा स्वभाव व्यक्तिगत चित्रना मध्ये उतरवलं तर त्याला स्पर्धा करता येणार. याचा अर्थ असा की तुम्ही स्वतः स्वतःच्या जीवनातला अर्थात शिक्षणाला स्पर्श करू शकता आणि उंच आभाळात पक्षाप्रमाणे उंच झेप घेऊ शकता.
*तात्पर्य* जीवनात स्वतःला ओळखण्याची संधी देऊन आभाळाला स्पर्श करणे म्हणजे स्वतःला ओळखणे.

*सायली संजय धामणे*

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button