Bollywood

पॉर्न पटांचा निर्माता राज कुंद्रा ला 23 जुलै पर्यंत पोलीस कोठडी..

पॉर्न पटांचा निर्माता राज कुंद्रा ला 23 जुलै पर्यंत पोलीस कोठडी..

मुंबई सुप्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी चा पती राज कुंद्रा याला 23 जुलै पर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने दिली आहे. अटक झाल्या नंतर राज कुंद्रा हा पोलीस कस्टडीत होता.मुलींना फसवून अश्लील चित्रपट तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. यात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याचं नाव देखील समोर आलं आहे.त्याला अटक झाल्यापासून या प्रकरणात नवीन खुलासे होत आहेत. दरम्यान पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार राजची कंपनी लंडनमधील एका चित्रपट कंपनीसाठी या पॉर्नपटांची निर्मिती करत होती.

उद्योगपती आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला सोमवारी रात्री अश्लील चित्रपट निर्मिती आणि त्याचे काही डिटेल्स सोशल मिडिया वर प्रकाशित केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे.यात राज ला 23 जुलै पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण..!

मुंबई पोलिसांच्या पथकाने मढ येथील ग्रीन पार्क मधील एका बंगल्यात पोर्नोग्राफी ची शूटिंग होत असल्याची माहिती मिळाल्याने धाड टाकली होती. त्यावेळी पोलिसांनी एका मुलीची सुटका करत अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये दोन अभिनेते तर दोन तरुणी होत्या.या दोन्ही तरुणी अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी आलेल्या ह्या तरुणी पॉर्नोग्राफिक व्हिडीओ तयार करणाऱ्या प्रोडक्शन हाऊसच्या जाळ्यात अडकल्या होत्या. या प्रकरणाचा तपास सुरू होता.परिणामी अनेक सूत्र पोलिसांच्या हाती लागले होते.यातूनच राज कुंद्रा आणि प्रदीप बक्षी यांचा संबंध समोर आला.राज चा प्रदीप नातेवाईक असून तो यूकेमध्ये राहतो. त्याची केनरीन प्रॉडक्शन हाऊस नावाची कंपनी आहे.तर राज हा भागीदार आहे.

कुंद्रा आणि बक्षी यांच्यातील स्फोटक व्हॉट्सअ‍ॅप चॅटवरून पैशांची देवाण-घेवाण कशी झाली आणि अश्लील कंटेटद्वारे अँडवान्स रक्कम कशी मिळवली गेली. हे दोघांच्या संभाषणात समोर आलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरचं ग्रुप चॅट पोलिसांच्या हाती लागलं आहे.

वादग्रस्त मॉडेल-अभिनेत्री गहना वशिष्ठ आणि उमेश कामत यांनी केनरीन प्रॉडक्शन हाऊससाठी अश्लील चित्रपट बनवले. वेगवेगळ्या प्रकारचे अश्लील चित्रपट करण्यासाठी ही कंपनी पैसे पुरवत होती.पोर्नोग्राफी प्रकरणातील तपासादरम्यान मुंबई क्राइम ब्रँचला अशीही माहिती मिळाली की देशभरातील वेगवेगळ्या एजंट्समार्फत पोर्न व्हिडिओ बनवणे आणि त्यांना पैसे पुरवणे यात केनरीन प्रॉडक्शन हाऊसचा सहभाग आहे.

6 महिन्यांच्या तपास आणि मग राज.. मुंबई ते लंडन अशी होती कामाची लाईन..

राज विरोधात तक्रार दाखल झाली होती. मॉडेल्स ना काम देण्याचं लालच दाखवून त्यांना या इंडस्ट्रीत आणल जायचं.पण राज पर्यंत पोहचायला पोलिसांना 6 महिने लागले.
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचे पती आणि उद्योजक राज कुंद्रा यांच्याविरोधात पॉर्नोग्राफीची केस समोर आली आहे. राज कुंद्राला 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button