Mumbai

बारावीचा निकाल वेळेत लागेल..बोर्डाने दिली  ग्वाही

बारावीचा निकाल वेळेत लागेल..बोर्डाने दिली ग्वाही

मुंबई बारावीच्या निकालाचे ८३ टक्के काम पूर्ण झाले आहे, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सांगितले आहे.थोडेच काम बाकी असून येत्या दोन दिवसांत पूर्ण होऊ शकते त्यामुळे निकाल वेळेवर जाहीर होईल असे मंडळाकडून सांगण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने 31 जुलै च्या आत 12 वी जाहीर करावा असे आदेश दिले आहेत. संकेतस्थळाचा गोंधळ, मुंबईतील गेल्या दोन दिवसातील मुसळधार पाऊस यामुळे कदाचित निकाल वेळेत लागणार नाही अशी भिती विद्यार्थी आणि पालकांना आहे. बुधवारी रात्रीपर्यंत बारावी निकालाचे काम ८३ टक्के पूर्ण झाले असून, निकाल वेळेत जाहीर होईल असे मंडळाने स्पष्ट केले आहे.

बारावीच्या शिक्षकांना २१ जुलैपर्यंत मंडळाच्या कम्प्युटर प्रणालीमध्ये विषयनिहाय गुण भरावयाचे होते पण दिलेल्या कालावधीत काम पूर्ण होणार नव्हते म्हणून ही मुदत २३ जुलैपर्यंत वाढविण्यात आली होती. संकेतस्थळाच्या अडचणीमुळे काम पूर्ण होऊ शकत नाही अशी अडचण समोर होती. त्यातच गेले दोन दिवस राज्यात ठिकठिकाणी व विशेषतः कोकण पट्ट्यात, मुंबई परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून शिक्षकांना आपापल्या शाळा-कॉलेजांत पोहोचणे शक्य झालेले नाही. पुढील चार दिवस असाच पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे.

दरम्यान शिक्षकांनी मुदत वाढीची मागणी केली असून मुसळधार पाऊस,इंटरनेट असुविधा , वीज खंड इ कारणांमुळे उशीर होत आहे.असे असेल तरी निकाल मात्र वेळेवर लागेल अशी ग्वाही मंडळाने दिली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button