Mumbai

Mumbai Diary: ओहो… आता UPI चा उपयोग करून काढा ATM मधून पैसे… पहा व्हिडिओ…

Mumbai Diary: ओहो… आता UPI चा उपयोग करून काढा ATM मधून पैसे… पहा व्हिडिओ…

मुंबई उद्योग विश्वास प्रसिद्ध असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी UPI (Unified Payments Interface) अ‍ॅप्लिकेशनद्वारे काम करणार्‍या एका अद्भुत एटीएमचा व्हिडीओ शेअर केला आहे. महिंद्रा यांनी ट्विटर प्लॅटफॉर्वर व्हिडीओ शेअर केला असून, ‘या’ जुगाडाला तंत्रज्ञानाला एक अद्भुत आविष्कार म्हटले आहे.

महिंद्रा यांनी शेअर केलेल्या पोस्टनुसार, यूपीआय आधारित एटीएम नुकतेच मुंबईत झालेल्या ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये प्रदर्शित करण्यात आले. महिंद्रा समूहाच्या अध्यक्षांनी लिहिले, ‘UPI एटीएमचे ५ सप्टेंबर रोजी मुंबईतील ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२३ मध्ये अनावरण करण्यात आले. भारत ज्या वेगाने वित्तीय सेवांचे डिजिटायझेशन करीत आहे आणि त्यांना कॉर्पोरेट केंद्रित (क्रेडिट कार्ड कंपन्यांसाठी धोक्याची घंटा?) बनवण्याऐवजी ग्राहक केंद्रित बनवत आहे, तो आश्चर्यकारक आहे.

भारतातील पहिले UPI ATM
अलीकडेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या सहकार्याने हिताची पेमेंट सर्व्हिसेसने काल भारतातील पहिले UPI ATM लाँच केले. हे व्हाईट लेबल एटीएम (WLA) म्हणून लाँच केले गेले आहे. याद्वारे कोणत्याही अडचणीशिवाय रोख रक्कम काढता येणार आहे. तसेच फिजिकल एटीएम ठेवण्याची गरजसुद्धा संपुष्टात येणार आहे. यामुळे काही बँकांच्या ग्राहकांना ‘क्यूआर आधारित कॅशलेस पैसे काढण्याचा’ आनंद घेता येईल, असा अनुभव मिळेल.

UPI ATM मधून पैसे कसे काढायचे?
तुम्हाला काढायची असलेली रक्कम निवडा.
तुम्ही निवडलेल्या रकमेशी संबंधित UPI QR कोड दाखवला जाईल.
QR कोड स्कॅन करण्यासाठी तुमचे UPI अॅप वापरा.
व्यवहाराची खातरजमा करण्यासाठी तुमचा UPI पिन एंटर करा.
आता तुमची रोख रक्कम एटीएममधून बाहेर येईल.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button