Chopda

स्थलांतरी मजुरांचे निवास शिबीरांची न्यायाधीश श्री पळसपगाराकडून पाहणी

स्थलांतरी मजुरांचे निवास शिबीरांची न्यायाधीश श्री पळसपगाराकडून पाहणी

चोपडा लतीश जैन

कोरोना व्हायरस मुळे संपुर्ण जग चिंतेत पडले आहे देशात लॉंगडाउन सुरू असल्याने शासन – प्रशासन मोठ्या जिकरीने या महाभयंकर महामारीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे यात प्रशासनाने स्थलांतरीत मजुरांसाठी निवास शिबिर तयार केली यांचीसुविधा सुरळीत आहे की नाही हे तपासणीसाठी सुप्रिम कोर्टाने तालुका कोर्टाला आदेश दिले होते की येथील मजुरांना जेवण, राहण्यासाठी व आरोग्य संदर्भातील काही अडचण आहे का ? यांची पाहणी केली प्रथम वर्गाचे न्यायाधीश पी.बी.पळसपगार यांनी केली.

प्रथम कृषि उत्पन्न बाजार समितीत नंतर बोथरा मंगल कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून त्यांच्या काही समस्या आहेत का ? हे जाणून घेतले यावेळी त्यांचा सोबत तहसीलदार अनिल गावित , निवडणूक निर्णय अधिकारी राजेश पऊळ ,तालुका आरोग्य अधिकारी लासुरकर सो. प्रभारी नायब तहसीलदार एच.यु. सैय्यद, संरक्षण अधिकारी प्रतीक पाटील, लिपिक लियाकत तडवी, पेसा समनव्यक प्रदीप पाटील, ललेश चौधरी, कोर्ट लिपिक आर.आर.ठाकूर आदी हजर होते .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button