AurangabadMaharashtra

भविष्य सांगण्याच्या बहाण्याने गुंगीचे औषध देऊन लुटणाऱ्या भोंदू बाबांना अटक

भविष्य सांगण्याच्या बहाण्याने गुंगीचे औषध देऊन लुटणाऱ्या भोंदू बाबांना अटक

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : भविष्य सांगण्याच्या बहाण्याने लोकांच्या घरी प्रवेश करून गुंगीचे पदार्थ असलेले भस्म देवून लुटणाऱ्या दोन भोंदू बाबांना औरंगाबाद शहर पोलिस दलाने अटक केली आहे. घरोघरी जाऊन भविष्य सांगत असल्याचा बहाणा करून महिलांच्या कपाळाला गुंगीचे पदार्थ असलेला भस्म लावून सोने-चांदीचे दागिने लुटणाऱ्या भोंदू बाबांना मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली आहे. अशा प्रकारचे शहरातील गुन्हे उघडकीस आणून चोरी गेलेली मालमत्ता हस्तगत केली आहे.
घरी येणाऱ्या भोंदू बाबांना, अनोळखी लोकांना घरी प्रवेश देणे टाळावा, त्यांच्या वर विश्वास ठेवू नये, असे आवाहन शहर पोलीस दलाकडून करण्यात आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button