Arondol

एरंडोल येथील आरोग्यदूतास नाना पटोलेंकडून करण्यात आले गौरवान्वित

एरंडोल येथील आरोग्यदूतास नाना पटोलेंकडून करण्यात आले गौरवान्वित

एरंडोल : येथील आरोग्यदूत तथा पञकार विकी खोकरे यांचा महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
सुमारे दिड वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोना महामारीच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता अव्याहतपणे रूग्णसेवेसाठी सदैव तत्पर असणार्या आरोग्यदूत तथा पञकार विकी उर्फ युवराज फकीरा खोकरे यांना महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
‘अखंड आरोग्यसेवेसोबतच सकस आहाराची जोड, ही संकल्पना प्रत्यक्ष राबवित विकी खोकरे या युवकाने समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या सद्भावनेतून कोरोना काळात येथील ग्रामीण रूग्णालयात व शासकीय कोविड केअर केंद्रातील रूग्णांना आपल्या रूग्णवाहीकेच्या तुटपूंज्या कमाईतून २५ हजार रूपये फळविक्रेत्याला देत फळे पुरविली,चिकन,मटण सूप स्वत: तयार करून वितरीत ही केले.
एवढेच नव्हे राञी-अपराञी अत्यवस्थ रूग्णांसाठी कोणतीही मदत लागल्याच ती मदत ही या आरोग्यदूताकडून करण्यात आली.
याच जनसेवेचा सन्मान म्हणून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी एरंडोल येथे म्हसावद नाक्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांशी बुधवारी रात्री साडेआठ वाजता संवाद साधण्यासाठी आले असता विकी खोकरे यांना पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देऊन कोरोना योद्धा म्हणून गौरविण्यात आले.
याप्रसंगी मंचावर ना.नाना पटोले,आ.प्रणिती शिंदे,आ. शिरीष चौधरी, डॉ. उल्हास पाटील, अँड-संदीप भैय्या पाटील, शोभाताई बच्छाव,श्याम जी पांडे,अतुल लोंढे आदी नेते होते. यावेळी एरंडोल तालुका कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय अण्णा महाजन,डॉ.फहराज बोहरी,प्रा.आर.एस.पाटील,संजय गलीचंद भदाणे,मदन भावसार संजय कलाल आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button