Karnatak

हुलसूर येथे मल्लिकार्जुन खुबा याची भव्य रँली

हुलसूर येथे मल्लिकार्जुन खुबा याची भव्य रँली

महेश हुलसूरकर कर्नाटक

कर्नाटक : बसवकल्याण येथील आमदार बी.नारायणराव याचे अकस्मीक निधन झाल्याने याठिकाणी आमदारकी पोटनिवडणूक दि.१७ एप्रिल रोजी मतदान होणार आहे त्यामुळे विविध पक्षाचे उमेदवार आपल्या परिने सभा रँली काढत आहेत.
भाजप ने रहिवासी उमेदवारांना उमेदवार तिकीट देण्याची अशवासन दिले होते बसवकल्याण क्षेत्रातील १६ उमेदवार ईछुक होते त्यापैकी एक जणांना देणार होते पण बाहेरील उमेदवारांना तिकीट देऊन आम्हा सर्वांना नाराज केले आहे त्यामुळे मी बसवकल्याण क्षेत्रासाठी स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केले आहे बसवकल्याण शहरातील भाजपचे बंडखोर उमेदवार मल्लिकार्जुन खुबा यांनी सोमवारी हुलसूर येथील श्री साई बाबाच्या मंदिरात नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली विविध चौकात चौकातील पुतळ्याना हार अर्पण केले व सर्व नागरिकांना हात जोडून मतदान करण्याची विनंती केली पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, हुलसुर हा बसवकल्याण विकासाप्रमाणे विकसित होत आहे. मी जेडीएसमध्ये होतो तेव्हा बी.एस. येडियुरप्पा आणि पक्षाचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा म्हणाले, “मी माझ्या आयुष्याचा हा भाग विकसित करीत आहे.” मी वयाच्या 26 व्या वर्षी मी अनेक लोकांसाठी आमदार म्हणून काम केले आहे आणि मला खात्री आहे की लोक माझा त्याग करणार नाहीत. ते म्हणाले की मराठा समाजाने मराठा समाजातील नेते मुळे यांनी राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यांनी अर्ज हा वापस काढून घेतला आहे त्यामुळे शरद पवार यांचे नाव पुर्ण मातीत घातले आहे.
त्याचबरोबर त्यांच्यासह बसवा कल्याण स्वाभिमानीचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button