Aurangabad

धावत्या मालगाडीच्या गार्ड ची प्रकृती बिघडली

धावत्या मालगाडीच्या गार्ड ची प्रकृती बिघडली

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : मनमाड ते दौलताबाद पर्यंत मालगाडी माल घेऊन निघाली मनमाड हुन 15:30 वा सुटली. लासूर स्टेशनवर 17:45 वाजे दरम्यान पोहचली. 18:20 ते 30 दरम्यान श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. मालगाडी रेल्वे गार्ड अलिखान यांनी वेळेत ही माहिती लासूर स्टेशन कर्तव्य वरील मास्टर कमल श्रीवास्तव यांना वाकी टॉकी वरून दिली. स्टेशन मास्टर श्रीवास्तव यांनी ही माहिती वेळ वाया न जाऊ देता नांदेड रेल्वे नियंत्रण कक्ष अधिकारी यांना देत सोबतच रेल्वे सेना अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांना दिली.

तब्येत विषयी अधिक माहिती घेवून ही माहिती रेल्वे सेना गोल्डन ग्रुप सदस्य मनीष मुथा यांना देऊन तातडीने डॉक्टर टीम रेल्वे स्टेशनवर घेऊन जावी असे सांगितले. यावरून मनीष मुथा हे डॉ अभिजित किशोर पवार यांच्या सह स्टेशनमध्ये दाखल झाले तात्काळ डॉ यांनी औषध उपचार केले. या घटनेची माहिती रेल्वे सेना अध्यक्ष सोमाणी यांनी औरंगाबाद स्टेशन व्यवस्थापक लक्ष्मीकांत जाखडे , रेल्वे सुरक्षा बल निरीक्षक अरविंद शर्मा व रेल्वे वरिष्ठ अधिकारी यांना दिली

रेल्वे अधिकारी यांनी तात्काळ रोटेगाव येथून औरंगाबाद कडे येत असलेल्या दोन इंजिन(एकास एक जोडलेली) चालकास लासूर हुन तातडीने गार्ड अली खान यांना पुढील उपचार साठी औरंगाबाद येथे आणण्याचे आदेश दिले. औरंगाबाद येथे परिवार सह वास्तव असल्याने नातेवाईक देखील तातडीने औरंगाबाद रेल्वे स्टेशन येथे संध्याकाळी 19:15 वा येऊन खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असून उपचार सुरू आहे. रेल्वे गार्ड यांना उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे.

या कामी रेल्वे सेना अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी ,रेल्वे सेना गोल्डन गृप सदस्य मनीष मुथा , डॉ अभिजित किशोर पवार , उप स्टेशन मास्टर कमल श्रीवास्तव , स्टेशन मास्टर राजेश गुप्ता , औरंगाबाद स्टेशन व्यवस्थापक लक्ष्मीकांत जाखडे , रेल्वे सुरक्षा बल निरीक्षक अरविंद शर्मा इत्यादी सेवा कार्य केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button