Kolhapur

प्रत्येक शाळेत शिक्षकभारती वाढवूया – पुणे विभागीय अध्यक्ष दादासाहेब लाड. शिक्षक भारती संघटनेची जिल्हा व तालुका कार्यकारिणी जाहीर.

प्रत्येक शाळेत शिक्षकभारती वाढवूया – पुणे विभागीय अध्यक्ष दादासाहेब लाड.
शिक्षक भारती संघटनेची जिल्हा व तालुका कार्यकारिणी जाहीर.

सुभाष भोसले कोल्हापूर

कोल्हापूर : आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकभारती संघटना महाराष्ट्रभर कार्यरत आहे. या संघटनेची पाळेमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत रुजविणे आवश्यक आहे .शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षक भारती संघटना कटिबद्ध आहे असे प्रतिपादन शिक्षक भारती संघटनेचे पुणे विभागीय अध्यक्ष दादासाहेब लाड यांनी केले. एस एम लोहिया जुनियर कॉलेज येथे 21 फेब्रुवारी रोजी शिक्षकभारती संघटनेची कोल्हापूर जिल्हा व तालुकास्तरीय मिटिंग संपन्न झाली. यावेळी कोल्हापूर जिल्हा , शहर व तालुकास्तरीय पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी बोलताना दादासाहेब लाड म्हणाले की, आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकभारती संघटना अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहे. शिक्षण क्षेत्रात असणारे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षक भारती संघटना कटिबद्ध असून शाळा तिथे शिक्षक भारती संघटनेचे कार्यकर्ते निर्माण झाले पाहिजेत .त्याद्वारे शिक्षक व शिक्षकेतर यांचे प्रश्न मार्गस्थ लावता येतील. यासाठी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यरत रहावे असे आवाहन यांनी केले. याप्रसंगी गजानन चव्हाण , संजय परीट , एस एस चव्हाण,नरेंद्र कुमार भोसले आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले .स्वागत शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष काकासाहेब भोकरे यांनी केले . प्रास्ताविक जिल्हा सचिव अनिल चव्हाण यांनी केले .आभार कैलास सुतार यांनी मानले. सूत्रसंचालन अशोक मानकर यांनी केले .या बैठकीला कोजिमाशी पतसंस्था चेअरमन बाळ डेळेकर,राजेंद्र रानमाले, एच आर पाटील, रवींद्र मोरे आदी मान्यवर व कोल्हापूर जिल्हा व सर्व तालुक्यातील शिक्षक भारती संघटनेचे नवनिर्वाचित पदाधिकारी उपस्थित होते. शिक्षक भारती संघटनेची नूतन जिल्हा कार्यकारणी खालील प्रमाणे- जिल्हा अध्यक्ष श्री काकासाहेब भोकरे, जिल्हा कार्यअध्यक्ष श्री बाळ डेळेकर , जिल्हा उपाध्यक्ष श्री भीमराव मलगुंडे , नरेन्द्र कुमार भोसले, युवराज गुरव, गणपती चव्हाण ,संजय परीट ,मोहन पाटील, जिल्हा कार्यवाह अनिल चव्हाण, सहकार्यवाह गौतम पाटील ,महादेव मोरुस्कर, मनोहर पाटील, बापू लोंडे, कादर जमादार ,संघटक गोविंद धुरे,राजेंद्र रानमाळे, चंद्रशेखर शहा, अशोक मानकर, संजय व्हणागडे, खजिनदार – संजय गावडे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button