Boliwood

तानाजी द अनसंग वॉरियर….मराठा आणि मोगलांची लढाई दर्शविणारा ‘तन्हाजी’ने  भक्कम अभिनयाने जिंकली मने

बॉलिवूडतान्हाजी मूव्ही रिव्यू: मराठा आणि मोगलांची लढाई दर्शविणारा ‘तन्हाजी’ने भक्कम अभिनयाने जिंकली मनेतानाजी
द अनसंग वॉरियरजयश्री साळुंकेअजय देवगण निर्मित आणि ओम राऊत दिग्दर्शित तान्हाजी द अनसंग वॊरियर चित्रपटाची दमदार एन्ट्री झाली आहे. 2016 साली अजय देवगण आणि टीमने चित्रपट बनवायला सुरुवात केली होती. तब्बल साडे तीन चार वर्षे एकाच चित्रपटावर मेहनत करून भारतीय प्रेक्षकांसाठी एक भव्यदिव्य, अप्रतिम अशी ऐतिहासिक कलाकृती निर्माण केली आहे. त्यातही मराठी प्रेक्षकांसाठी आणि विशेष म्हणजे पुण्यातील प्रेक्षकांना तर पर्वणीच. कारण, सुभेदार तानाजी मालुसरे म्हटलं की कोंढाणा किंवा सिंहगड, आणि सिंहगड म्हटलं की पुणे. सिंहगडाशी पुणेकरांचं एक घट्ट नातं आपोआप जोडलं गेलं आहे. सिंहगडावरची झुणका भाकर, वांग्याचं भरीत, ताक, दही , खेकडा भजी यांची सर जगातील कोणत्याही फाईव्ह स्टार हॉटेलातील पदार्थाला कधीच येणार नाही. सिंहगडावरील पुणे दरवाजा, कल्याण दरवाजा, द्रोणागिरी कडा ज्याला आपण तानाजी कडा किंवा घोरपडीचा कडा म्हणून ओळखतो. सुभेदारांचे समाधी स्थळ, कोंढानेश्वर, राजाराम महाराजांची समाधी, दारू कोठार ही ऐतिहासिक स्थळं आपण कित्येक वेळा सिंहगडावर जाऊन पाहिली आहेत. पण हाच कोंढाणा, कल्याण दरवाजा, द्रोणागिरी कडा आणि आपले सुभेदार तानाजी मालुसरे यांचा इतिहास जेव्हा आपण चित्रपट रूपाने पडद्यावर पाहतो तेव्हा उर भरून येतो. चित्रपटाशी आपलंही काहीतरी नातं आहे असं वाटत राहतं. कलाकारांची वेशभूषा, संगीत, गाणी, लढाईची दृश्ये सर्वकाही अप्रतिम. कधी कधी तर बाण, भाले तलवारी इ मुळे त्या काळातील ऐतिहासिक प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात.तानाजी द अनसंग वॉरियर....मराठा आणि मोगलांची लढाई दर्शविणारा 'तन्हाजी'ने  भक्कम अभिनयाने जिंकली मनेचित्रपटाची सुरुवातच लढाईच्या प्रसंगाने होते आणि तिथूनच चित्रपट आपली पकड घेतो. लढाईसाठी मावळ्यांनी वापरलेल्या युक्त्या, टेकनिक्स लाजवाब. कोंढाण्याची सुभेदारी घेण्यासाठी आलेल्या उदयभान सिंगची भूमीका सैफ अली खानने जबरदस्त वठवली आहे. औरंजेबाच्या दरबारातील दृश्य अप्रतिमरित्या सादर केले आहे. चित्रपटामध्ये सैफ अली खानची क्रूर आणि खुनशी भूमिका पाहिल्यावर पद्मावत मधील अल्लाउद्दीन खिलजी साकारणारा रणवीर आठवतो. त्याच्या तोडीस तोड काम सैफने केले आहे. छत्रपती शिवरायांची भूमिका तर आपल्या मराठ मोळ्या शरद केळकरने अगदी उत्तमरीत्या साकारली आहे. अजिंक्य देव, देवदत्त नागे, शशांक शेंडे यांनी अनुक्रमे सरदार पिसाळ, सूर्याजी मालुसरे, शेलार मामा यांच्या भूमिका जबरदस्त वठवल्या आहेत. काजोल मॅडम मऱ्हाटमोळ्या पेहरावमध्ये एकदम साजिऱ्या दिसतात. सुभेदारांच्या पत्नी सावित्रीबाई यांची भूमिका त्यांनी जेवढ्या हळव्या तितक्याच कणखर बाण्यातून पुरेपूर साकारली आहे.”कुत्ते की तरह जिने से अच्छा है, शेर की तरह मरना।”अजय देवगण बद्दल तर बोलायलाच नको. तीन चार वर्षांची मेहनत त्याच्या प्रत्येक प्रसंगात दिसते. अजय देवगणच्या तोंडून येणारी वाक्ये अंगावर शहारा आणल्याशिवाय राहणार नाही.एक प्रसंगांमध्ये उदयभान म्हणतो, “मेरे सामने आनेवाला शायद ही कोई पागल होगा?”तेव्हा तानाजी म्हणतो, “जब भी कोई तुम्हारे सामने खडा रहेगा। समझ लेना की, एक तो वो पागल है। या फिर मराठा।”हर मराठा पागल है। स्वराज्य का। शिवाजी राजे का। भगवे का।”तेव्हा उदयभान म्हणतो,
“अगर ऐसा है, तो इस भगवे को मिटाकर रहुंगा ।”त्यावर सुभेदारांच कणखर उत्तर मिळतं,
“अरे तू क्या मिटायेगा भगवे को। जिसका एलान खुद असमान करता है, दिन में दो बार। एक सूरज उगनेसे पहले और सुरज ढलने के बाद।”तेव्हा उदयभान शांत स्वरात म्हणतो,
“‘तेरी मिट्टी जजबात से जुडी है और मेरी अकल पाणी से। तू जान दे सकता है, मैं जान ले सकता हुं।”
त्या प्रसंगातील त्याची देहबोली, हावभाव, बोलण्याची पद्धत एकंदरीत जबरदस्त जमलं आहे.काही प्रसंगांमध्ये तर छ. शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव आपल्या तोंडून कधी बाहेर पडतं आपल्यालाही कळत नाही. कोंढण्याची मोहीम तानाजीला कळू न देण्यासाठी राजांची आगतिकता त्यांच्या देहबोलीतून तानाजी नेमकी हेरतो. आणि मोहिमेबद्दल सरदार पिसाळ यांचेकडून कळल्यावर एका रचलेल्या नाट्य प्रसंगातून दोघांच्या डोळ्यांत आलेले अश्रू आपल्या खऱ्या मैत्रीची आठवण केल्या शिवाय राहत नाही. नंतर शिरढोणच्या डोंगरातील प्रसंग तर हृदय हेलावून टाकतो, डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहत नाही. उदेभान मोगली सेनेसह मोठाल्या नावा आणि तराफे घेऊन नदीतून प्रवास करतानाचा प्रसंग तर जबरदस्त. द पायरेट्स ऑफ कॅरिबीयन चित्रपटाची आठवण नक्कीच होते. क्रूरकर्मा आणि खुनशी उदयभान प्रसंगांमधून ठसत जातो. आपण त्याचा राग अन तिरस्कार न कळत करायला लागतो. तानाजी त्याची जिरवतो . तानाजीच्या रूपातील अजय देवगण डाव्या हातात ढाल घेऊन जमिनीवर आपटतो तो प्रसंग तर जबरदस्त. आजवरच्या कोणत्याही चित्रपटामध्ये पाहिला नसेल एवढा जोशपूर्ण, प्रेरणादायी आणि हृदय हेलावून टाकणारे प्रसंग आहेत.जबरदस्त व्हीएफएक्स इफेक्ट्स, अनिमेशन, लढाईचे प्रसंग, आणि 3डी ची जोड अप्रतिम अनुभव देऊन जातात. प्रेक्षकांनी बाहुबलीशी तुलना करू नये, तो एक काल्पनिक कथेवर बेतलेला चित्रपट आहे तर हा ऐतिहासिक सत्य घटनांवर. सर्वांनी आपल्या कुटुंबाला घेऊन नक्कीच पहावा असा चित्रपट. महाराष्ट्राच्या दैदिप्यमान इतिहासातील एक सुवर्ण पान आपल्याला या निमित्ताने 3डी मध्ये अनुभवण्याची संधी सिनेमा घरामध्ये जाऊन पहावी अशीच आहे.द अनसंग वॉरियर नावाच्या सिरीज मधील हा पहिला चित्रपट आहे. याच सबटायटल वर आणखी चित्रपट येतील असे अजय देवगण यांनी पुण्यातील सिजन मॉल मध्ये घोषणा केलेली आहे. येणारे आगामी चित्रपट नक्कीच असे असतील अशी अपेक्षा.बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा ‘तन्हाजी: द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट 10 जाने ला प्रदर्शित झाला आहे . या चित्रपटात अजय देवगन व्यतिरिक्त या चित्रपटात त्यांची पत्नी काजोल आणि सैफ अली खान सारख्या कलाकारांचीही भूमिका आहे.
चित्रपटाच्या कथेत मराठे आणि मुघल यांच्यातील युद्ध दिसून येते. मराठा योद्धा छत्रपती शिवाजीराजे भोसले सामंजस्याच्या हेतूने मोगलांकडे जातात आणि त्यांना पकडतात आणि 23 किल्ले ताब्यात घेतात. त्यातील एक म्हणजे कोंढाणा किल्ला.मोगल हा किल्ला घेतात आणि त्यावर भगवा ध्वज काढून टाकतात. सुभेदार तानाजी (अजय देवगण) आणि छत्रपती शिवाजीराजे भोसले (शरद केळकर) हा किल्ला परत मिळवण्यासाठी मोगलांशी युद्ध करतात.चित्रपटाच्या देखावा, संवाद आणि दिग्दर्शनाबद्दल बोला, ते उत्कृष्ट आहे. अजय देवगन, सैफ अली खान आणि शरद केळकर जेव्हा पडद्यावर येतात तेव्हा त्यांची भूमिका चांगली आहे. अजय आणि काजोल यांचे प्रेमही चांगलेच दाखवले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button