Boliwood

बॉलिवूडची सुपरस्टार दिपिका पदुकोण चा छपाक आणि तानाजी ची तुलना अशक्य..जे. एन.यु.ची भेट कारणीभूत ठरतेय का…

बॉलिवूड

बॉलिवूडची सुपरस्टार दिपिका पदुकोण चा छपाक आणि तानाजी ची तुलना अशक्य

जे एन यु ची भेट कारणीभूत ठरतेय का

प्रा जयश्री साळुंके

सध्या तानाजी आणि छपाक या दोन चित्रपटांच्या प्रदर्शना नंतर त्यांच्या यश अपयशाची तुलना जोरात सुरू आहे. दोन्ही चित्रपट वेगवेगळे असून दोघांची तुलना करणे अयोग्य आहे. तानाजी हा चित्रपट ऐतिहासिक विषयावर आधारित असून छपाक चित्रपटाची कथा महिलांवर होणाऱ्या हिंसाचारा संदर्भात आहे.

बॉलिवूडची सुपरस्टार दिपिका पदुकोण चा छपाक आणि तानाजी ची तुलना अशक्य..जे. एन.यु.ची भेट कारणीभूत ठरतेय का...

तानाजी चित्रपटाने जरी बॉक्स ऑफिसवर मोठया प्रमाणात कमाई केली असली तरी ज्या पद्धतीने छपाक आणि दीपिका पदुकोण यांना विरोधात्मक परिस्थिती निर्माण करण्यात आली. त्यामागे दिपिका पदुकोणचे जे एन यु विद्यापीठात जाणे तेथील विद्यार्थ्यांना भेटणे आणि आपली संवेदनशील वृत्ती दाखवून सध्या देशात सुरू असलेल्या भेदात्मक वातावरणाला तडा देने या गोष्टी जबाबदार आहेत.

बॉलिवूडची सुपरस्टार दिपिका पदुकोण चा छपाक आणि तानाजी ची तुलना अशक्य..जे. एन.यु.ची भेट कारणीभूत ठरतेय का...

बॉलिवुडच्या सुपरस्टारने मंगळवारी रात्री भारतातल्या एका संवेदनशील विद्यापीठाला अचानक भेट दिली.हे ठिकाण आहे जेथे विद्यार्थ्यांवर हल्ला झाला होता.

बॉलिवूडची सुपरस्टार दिपिका पदुकोण चा छपाक आणि तानाजी ची तुलना अशक्य..जे. एन.यु.ची भेट कारणीभूत ठरतेय का...

एक संवेदनशील व्यक्ती आणि देशातील एकूण परिस्थिती लक्षात घेऊन दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी दीपिका पादुकोण त्यांच्यासोबत उभी राहिली.

रविवारी रात्री या विद्यापीठाच्या कॅंपसवर झालेल्या हल्ल्याचा हे विद्यार्थी निषेध करत होते. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाशी या हल्लेखोरांचा संबंध असल्याचा दावा करण्यात येतोय. दीपिका काही बोलली नाही. शांतपणे आली, उभी राहिली आणि तितक्याच शांतपणे निघून गेली.

बॉलिवूडची सुपरस्टार दिपिका पदुकोण चा छपाक आणि तानाजी ची तुलना अशक्य..जे. एन.यु.ची भेट कारणीभूत ठरतेय का...

पुढच्या काही मिनिटांतच सोशल मीडियावर खळबळ उडाली. सिनेमावेड्या भारतामध्ये एक बॉलिवुड स्टारच अशी खळबळ निर्माण करू शकतो.

मोदी सरकारला पाठिंबा देणाऱ्या उजव्या विचारसरणीच्या गटांच्या निशाण्यावर असलेल्या विद्यापीठाच्या, वादात सापडलेल्या मुलांना ‘शूरपणे पाठिंबा’ दिल्याबद्दल दीपिकाचे फॅन्स, सहकारी आणि विद्यार्थी नेते तिचं कौतुक करतायत.

एरवी बॉलिवुडच्या नावाने नाकं मुरडणाऱ्यांनीही आपण दीपिकाचा नवीन सिनेमा पुन्हापुन्हा पाहणार असल्याचं जाहीर केलंय. अॅसिड हल्ला झालेल्या तरुणीच्या आयुष्यावर आधारित या सिनेमाची निर्मिती दीपिका पदुकोणनेच केलीय.

पण हा दीपिकाचा तिच्या फिल्मसाठी प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न असल्याची टीका मोदी सरकारच्या पाठिराख्यांनी केली आहे. दीपिकाला पाठिंबा देणारे आणि दीपिकाच्या सिनेमावर बहिष्कार घालण्याचे आवाहन करणारे असे दोन्ही प्रतिस्पर्धी हॅशटॅग्स ट्विटरवर ट्रेंड होत आहेत .

दीपिकाच्या वादग्रस्त विद्यापीठ कॅम्पसमध्ये जाण्यामुळे झालेला गदारोळ हा जनता समजू शकते.

भारतात सर्वांत जास्त भरभराट होणारी आणि आर्थिक उलाढाल होणारी सिनेसृष्टी प्रसिद्ध आहे. जवळजवळ तीन डझन सिनेमांमध्ये अभिनय करणारी दिपिका ही 34 वर्षांची अभिनेत्री या बॉलिवुडच्या मेगास्टार्सपैकी एक आहे. सोशल मीडियाबाबत बोलायचं झालं तर ट्विटरवर तिचे 2 कोटींपेक्षा जास्त आणि इन्स्टाग्रामवर 4 कोटींपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

2016 मध्ये फोर्ब्स मासिकाने सर्वांत जास्त मानधन दिल्या जाणाऱ्या जगातल्या 10 अभिनेत्रींमध्ये तिची गणना केली होती. त्याच्या पुढच्याच वर्षी दीपिका आणि तिचे पती रणवीर सिंग यांची एकत्र मिळकत 2.1 कोटी डॉलर्स असल्याचा अंदाज एका मासिकाने व्यक्त केला होता.

एक संवेदनशील, विचारपूर्वक काम करणारी अभिनेत्री म्हणून गेल्या काही वर्षांत दीपिका नावारूपाला आलेली आहे. मानसिक आरोग्य, नैराश्याविषयीच्या आपल्या लढ्याबद्दल ती जाहीरपणे, मोकळेपणाने बोलत असते .तसेच महिलांवर होणाऱ्या अत्याचरा संदर्भात देखील ती खम्बीरपणे वाचा फोडत असते,आवाज उठवत असते.या महिन्यात ती मानसिक आरोग्याविषयीची जागरूकता निर्माण करण्याच्या कामाविषयी बोलण्यासाठी डाव्होसला जाणार आहे.

2017 मध्ये रीलिज झालेल्या तिच्या पद्मावत सिनेमाच्या वेळीही तिला उजव्या विचारसरणीच्या लोकांच्या नाराजीचा सामना करावा लागला होता. यावेळी आंदोलकांनी सिनेमागृहांची तोडफोड केली आणि दीपिकाचं नाक छाटण्याचीही धमकी दिली होती.

दीपिका पदुकोणचं जेएनयूमध्ये हजर राहणं हे लक्षवेधक होतं. एखाद्या सामाजिक, सांस्कृतिक गोष्टीबद्दल भूमिका घेत नसल्याबद्दल अनेकवेळा बॉलिवुड मधील दिग्दर्शकांवर वा अभिनेत्यांवर टीका केली जाते. आणि जेंव्हा बॉलिवूड अभिनेत्री आणि दिग्दर्शक मते मांडत आहेत

मग आता दीपिका पदुकोणच्या कृतीमुळे काही बदल घडेल का? यामुळे बॉलिवुडचे ‘ए-लिस्टर’ म्हटले जाणारे अभिनेते आपली मतं मांडण्यास प्रवृत्त होतील का? भारतामध्ये मोदी सरकारच्या विरोधातली विद्यार्थ्यांची निदर्शनं ही महत्त्वाची आहेत. कारण यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाचा पुढाकार घेत नसून समाजाच्या पुढाकारातून ही निदर्शनं होत आहेत.

एकप्रकारे दीपिकाने या वातावरणाची नस अचूक पकडली. पाठिंब्याचं हे राजकारण कोणत्याही विचारसरणीच्या पलीकडचं आहे. म्हणूनच तिचं जेएनयूमध्ये हजर राहणं महत्त्वाचं होतं.

पण इतरांना मात्र याची खात्री वाटत नाही. देशामध्ये सध्या टोकाचे दोन मतप्रवाह आहेत. मोदींच्या हिंदू राष्ट्रवादाच्या राजकारणाचा पुरस्कार करणारे विरुद्ध धर्मनिरपेक्ष भारताच्या संकल्पनेवर विश्वास ठेवणारे असे दोन गट पडले आहेत.

दीपिका वर आता टीका करणारे तिचे सिनेमे पहायचं थांबवतील असं मला वाटत नाही. आपल्याकडे लोकांचे विचार सतत बदलत असतात. ते बहुतकेदा तात्पुरत्या कालावधी पुरते असतात.

मोदींच्या राजकारणाच्या विरोधात बोलणारी दीपिका पादुकोण ही काही बॉलिवुडमधली एकमेव मोठी व्यक्ती नाही. या अगोदर देखील अनेक वादग्रस्त गोष्टींवर आवाज उठविण्यात आला आहे मग तो नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि जेएनयूवर झालेल्या हल्ल्याच्या विरोधातल्या निदर्शनांना अनेक तरूण अभिनेत्री आणि प्रसिद्ध दिग्दर्शकांनी हजेरी लावली होती.

भारतातल्या प्रसिद्ध दिग्दर्शकांपैकी एक अनुराग कश्यप याने एका माध्यमाशी बोलताना म्हटलं होतं, “मोदी सरकारने देशाचं दोन प्रकारच्या लोकांमध्ये विभाजन केलंय – देशाच्या विरोधात असणारे आणि देशभक्त.”

देशामध्ये जे काही सुरू आहे त्याने आपल्याला दुःख होत असल्याचं जेएनयूच्या विद्यार्थ्यांची भेट घेण्यापूर्वी दीपिका पदुकोणने एका माध्यमाशी बोलताना म्हटलं होतं.

म्हणूनच या संदर्भात असे म्हणावे वाटते की दिपिका च्या छपाक ची तुलना कोणत्याही आकस बुद्धी ने तानाजी शी न करता दोन्ही विषय समजून घेणे आवश्यक आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button