आनंदवाडी येथे सार्वजनिक शिवजयंती उत्साहात साजरी
लातुर प्रतिनिधी:- प्रशांत नेटके
अहमदपूर तालुक्यातील आनंदवाडी या छोट्याश्या खेडेगावात अनेक वर्षांपासून चालत आलेल्या रुढीपरंपरे नुसार शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.यावेळी गावातील सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र येऊन शिवजयंती साजरी करतात आणि विविध कार्यक्रम शिवजयंती दरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.

सकाळी ११ वाजता शिवाजी चौक आनंदवाडी येथे झेंडावंदनाचा कार्यक्रम पार पडला त्यावेळी सर्व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या गावचे एक वैशिष्ट्य ते म्हणजे मुस्लिम आणि हिंदू समाज एकत्रित येऊन शिवजयंती साजरी करतात.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन बालाजी तोरणे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनतर झेंडावंदन करून गावातून मिरवणूक काढण्यात आली व संध्याकाळी विविध कार्यक्रम व्याख्यान रांगोळी स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडले .यावेळी गावचे प्रथम नागरिक सरपंच त्र्यंबक घोगरे ,ज्ञानेश्वर तोरणे,भगवान घोगरे ,स्वप्निल आजने, संगमेश्वर ढेपे, सुशील पाटील, कैलास मोगेकर, गुळवे सर, कदम सर ,सुलतान शेख, महबूब शेख,संभाजी घोगरे, पद्माकर कळमगावे इत्यादी नागरिक उपस्थित होते.






