BoliwoodMaharashtra

?️ बॉलिवूड…. कोणाच्या नावाचा भांगात कुंकू भरतात फिल्म अभिनेत्री  रेखा

?️ बॉलिवूड…

कोणाच्या नावाचा भांगात कुंकू भरतात फिल्म अभिनेत्री रेखा

मुंबई

बॉलिवूड मधली प्रसिद्ध अभिनेत्री रेखा यांची पूर्ण कारकिर्दीत ही त्यांच्या व्यवसायिक आयुष्या बरोबर तेवढीच वैयक्तिक आयुष्यबाबत सतत चर्चेत राहिलेली आहे. अभिनेत्री रेखा यांनी बऱ्याचवेळा भागांमध्ये कुंकू भरलेले आपण पाहिलेले आहे.

मागीलल काही वर्षांपूर्वी मीडियामध्ये अशी चर्चा रंगली होती की, अभिनेत्री रेखा यांचे लग्न अभिनेता संजय दत्तसोबत झाले होते आणि त्या संजय दत्तच्या नावाने भांगेत कुंकू भरतात. इतकेच नाही तर या गोष्टीचा उल्लेख रेखाः दअन्टोल्ड स्टोरी या त्यांच्या पुस्तकात देखील करण्यात आले असल्याचे म्हटले जात होते. हे पुस्तक प्रकाशित होण्या अगोदरच या गोष्टीची चांगलीच चर्चा मीडियावर रंगली होती.

अखेरला हे पुस्तक लिहणाऱ्या लेखकाला याबाबत स्पष्टीकरण द्यावे लागले होते. रेखाः दअन्टोल्ड स्टोरी या पुस्तकाचे लेखक यासीर उस्मान हे होते. त्यांनीच हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना सांगितले होते की, ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे. माझ्या पुस्तकात अशा कोणत्याच गोष्टीचा उल्लेख नाहीये.

ते म्हणाले की, मी फक्त संजय आणि रेखा यांच्या अफेअरची चर्चा असल्याबद्दलच लिहिलेले आहे. रेखा व संजय यांनी जमीन आस्मान या चित्रपटात एकत्र काम केले होते. आणि त्याचवेळी त्यांच्या दोघांच्या अफेअरची चर्चा मीडियावर चालली होती. एवढेच नव्हे तर त्या दोघांनी लग्न केले असल्याचे म्हटले जात होते. या सगळ्या बातम्या त्या काळात मीडियात चांगल्याच गाजल्या होत्या.

अखेरीस संजय दत्तने एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत या सगळ्या केवळ अफवा असल्याचे सांगितले होते. अभिनेत्री रेखा या सर्वात अगोदर ऋषी कपूर व नीतू सिंग कपूर यांच्या लग्नामध्ये भांगेत कुंकू भरून आल्या होत्या. त्यांना पाहाताच लग्नात उपस्थित असलेल्या सगळ्यांनाच धक्का बसला होता. या लग्नाला अमिताभ बच्चन आणि जया बच्चन तसेच अमिताभ बच्चन यांचे आई-वडील देखील उपस्थित होते.

रेखा यांनी भांगेत कुंकू भरल्याची चर्चा मीडियात देखील रंगली होती. अखेरीस रेखा यांनी या गोष्टीवर स्पष्टीकरत देताना सांगितले होते की, त्या चित्रपटाच्या चित्रीकरणावरून थेट लग्नाला आल्या होत्या. त्यामुळे त्यांनी भांगेत कुंकू भरले होते. तसेच मंगळसूत्रदेखील घातलेले होते.परंतु नेहमी कोणत्याही बॉलिवूड च्या समारंभात रेखा या पूर्ण तयार होऊन भांगेत कुंकू संपुर्ण साज सिंगार करून उपस्थित असतात आणि त्या आजही तितक्याच सुंदर दिसतात.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button