Boliwood

?️ ह्या अभिनेत्रीला स्वतःचा चित्रपट पहावयास होती बंदी

?️ ह्या अभिनेत्रीला स्वतःचा चित्रपट पहावयास होती बंदी

भारतीय सिनेमा जगतामध्ये सर्वोत्कृष्ट आणि सुंदर अभिनेत्रींची काही कमी नाही. बॉलीवूडमधील सर्वात सदाबहार अभिनेत्री नूतन यापैकीच एक आहे. ब्लैक अँड व्हाईट पासून ते रंगीत चित्रपटांपर्यंत आपल्या उत्कृष्ठ अभिनयाची छाप सोडलेल्या नूतनला आजही लोक विसरू शकलेले नाही. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कि कमी वयामध्ये बॉलीवूडमध्ये करियरची सुरवात करणाऱ्या नूतनसोबत असे काय घडले होते कि ज्यामुळे तिला आपलाच चित्रपट पाहण्यापासून रोखण्यात आले होते.

हिंदी सिनेमातील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक राहिलेली नूतनचा जन्म २४ जून १९३६ रोजी झाला होता. आपल्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री शोभना सामर्थ आणि निर्देशक कुमारसेन सामर्थच्या चार मुलांपैकी सर्वात मोठी मुलगी नूतन होती, ज्यांनी बॅटमिंटन, हॉर्स राइडिंग, स्विमिंग सारख्या अ‍ॅक्टिविटीज बरोबर संगीताचे सुद्धा प्रशिक्षणसुद्धा घेतले होते. अवघ्या ५ वर्षाच्या वयामध्ये नूतनने मुंबईमधील ताजमहल हॉटेलमध्ये परफॉरमंस दिला होता.

केवळ ९ व्या वर्षीच नूतनने आपल्या वडिलांच्या नल दमयंती या चित्रपटामध्ये एक बालकलाकार म्हणून अभिनय केला होता. १९५० मध्ये नूतनने वयाच्या १४ व्या वर्षी हिंदी फिल्म जगतामध्ये प्रवेश केला होता, या चित्रपटाचे दिग्दर्शन खुद्द नूतनची आई शोभना सामर्थने केले होते, ज्याचे नाव हमारी बेटी असे होते.

नूतन आपल्या जन्माच्या वेळी इतकी बारीक होती कि तिची आई तिला अगली बेबी आणि अगली डक सारख्या नावाने बोलवत असे. पण कोणाला माहित होते कि लहानपणी कुरूप म्हणून ओळखली जाणारी नूतन १९५२ मध्ये मिस इंडिया हा किताब जिंकून सर्वांनाच चकित करेल. असे पहिल्यांदाच घडले होते कि एखाद्या अभिनेत्रीने आपले फिल्मी करियर सुरु केल्याच्या दोन वर्षानंतर मिस इंडियाचा किताब जिंकला होता.

ज्यावेळी नूतन मिस ईंडीया बनली होती त्यावेळी निर्माता पंचोली प्रोडक्शनचा चित्रपट नगीना प्रदर्शित होणार होता आणि असे पहिल्यांदा झाले होते कि पंचोली प्रोडक्शन कडून या चित्रपटाचे प्रमोशन मोठ-मोठे पोस्टर लावून करण्यात आले होते कि या चित्रपटाची अभिनेत्री असलेल्या नूतनची मिस इंडिया म्हणून निवड करण्यात आली आहे.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल कि तिचा स्वतःच चित्रपट नगीना पाहण्यासाठी नूतनला चित्रपटगृहामध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. ज्याचे मुख्य कारण होते तिचे अवघे १४ वर्षे वय. चित्रपटाच्या प्रीमियरवेळी तिला वॉचमनने आतमध्ये जाण्यास रोखले होते. नूतनने त्या वॉचमनला खूप समजावण्याचा प्रयत्न केला परंतु वॉचमनने साफ मनाई केली. ज्यामुळे तिला चित्रपट न पाहताच परत घरी जावे लागले. नूतनचा हा चित्रपट प्रौढांसाठी होता ज्याला सेन्सर बोर्डाने ए प्रमाणपत्र दिले होते.

नूतनचे संगीताचे शिक्षण आणि तिचा गाण्याचा छंद तिला चित्रपटांमध्ये बराच उपयोगी पडला. या शिक्षणामुळेच तिने आपला पहिला चित्रपट हमारी बेटी मध्ये तुझे कैसा दूल्हा भाये री बांकी दुल्हनिया सारखे लोकप्रिय गाणे गायले होते. केवळ इतकेच नाही तर १९६० मध्ये छबीली चित्रपटासाठी आपली छोटी बहिण तनुजासोबत अभिनय करण्याबरोबरच नूतनने या चित्रपटामध्ये ६ गाणी सुद्धा गायली होती.

नूतनच्या जीवनामध्ये एक असा काळ देखील आला होता जेव्हा तिने आपले सर्व काही पणाला लावून तिला अभिनेत्री बनवणाऱ्या तिच्या आई शोभना सामर्थला न्यायालयात आमनेसामने तोंड द्यावे लागले होते. नूतनने आपली आई शोभना सामर्थवर आपल्या कमाईच्या पैशामध्ये हेर-फेर करण्याचा आरोप लावून न्यायालयामध्ये खटला दाखल केला होता. पण काही काळानंतर या दोघींचे संबंध पुन्हा पूर्वीसारखे झाले.

नूतनने अशोक कुमार सोबत बंदिनीमध्ये काम केले तर राज कपूर सोबत कन्हैया, छलिया आणि अनाड़ी सारख्या चित्रपटामध्ये काम केले. देव आनंद सोबत पेइंग गेस्ट, बारिश, मंजिल आणि तेरे घर के सामने सारख्या चित्रपटामध्ये काम केले. दिलीप कुमार सोबत त्यांची जोडी दोन वेळा बनता बनता राहिली परंतु १९८६ मध्ये कर्मा या चित्रपटामध्ये दोघांना एकत्र पाहिले गेले.

भारतीय सिनेमाची सर्वात महान प्रतिभाशाली आणि अद्वितीय अभिनेत्री नूतनला सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी ६ वेळा फिल्मफेयर अ‍ॅवॉर्ड देण्यात आला. बॉलीवूडमध्ये आतापर्यंत नूतनच्या या रेकॉर्डच्या बरोबरीला फक्त तिची भाची आणि बहिण तनुजाची मुलगी काजोलच पोहोचली आहे.

१९५९ मध्ये कमांडर रजनीश बहलसोबत लग्न आणि मुलगा मोहनीश बहलच्या जन्मापर्यंतसुद्धा नूतनचा फिल्मी प्रवास उत्कृष्ठरित्या सुरु होता पण १९८९ मध्ये अचानक नूतनला कॅन्सरसारख्या जीवघेणा आजाराने ग्रासले. अनेक प्रयत्न करून देखील बॉलीवूडची सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीने ५५ व्या वर्षी २१ फेब्रुवारी १९९१ रोजी या जगाचा निरोप घेतला. भलेहि नूतन आज या जगामध्ये नाही परंतु तिचा सर्वोत्कृष्ट अभिनय आज देखील लोकांच्यासाठी अभिनयाचे एक उत्तम उदाहरण म्हणून बनून राहील यात तिळ मात्र शंका नाही.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button