Maharashtra

अमळनेर येथील  दगडी दरवाजा खरोखर अतिशय जीर्ण झाला असून ताबडतोब प्रस्ताव पाठवून नगरपालिकेने ताब्यात घेऊन त्याचे नूतनीकरण व सुशोभीकरण करावे

अमळनेर येथील दगडी दरवाजा खरोखर अतिशय जीर्ण झाला असून ताबडतोब प्रस्ताव पाठवून नगरपालिकेने ताब्यात घेऊन त्याचे नूतनीकरण व सुशोभीकरण करावे.

प्रतिनिधी नूरखान

अशा सूचना पुरातत्व विभागाच्या सहाययक संचालक आरती आळे यांनी आमदार अनिल पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत दिल्या
वाहतुकीस अडसर ठरणाऱ्या आणि जीर्ण झाल्यामुळे व बुरुज कोसळल्यामुळे दगडी दरवाज्याचा विषय लवकर मार्गी लागावा म्हणून नागरिकांनी आमदार अनिल पाटील तसेच नगरपलिकेकडे मागणी लावून धरली होती परिस्थिती अतिशय गंभीर आणि पुरातत्व विभागाची अडचण , निधीची तरतूद नाही त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात होता कोणत्याही क्षणी बुरुज पूर्ण कोसळून अपघात होऊ शकतो म्हणून माजी आमदार साहेबराव पाटील यांनी पुढाकार घेऊन नगरपलिकेकडे हस्तांतर करून त्याचे जतन व सुशोभीकरणाची तयारी दर्शविली होती आमदार अनिल पाटील यांनी सांस्कृतिक मंत्रालयात पाठपुरावा करून संगोपन योजनेंतर्गत 10 वर्षासाठी नगरपलिकेकडे दरवाजा सोपवण्याची परवानगी मिळवली त्याचे पत्र आणि प्रत्यक्ष दरवाजाची पाहणी सहाययक संचालक आरती आळे यांनी साहेबराव पाटील , मुख्याधिकारी डॉ विद्या गायकवाड , पुरातत्व विभागाचे कृष्णा बालपांडे , अभियंता संजय पाटील , चेतन सोनार , संजय चौधरी यांच्या उपस्थितीत केली दरवाजामुळे झालेला अरुंद रस्ता , जीर्णावस्था पाहून त्यांनी तातडीने दुरुस्तीची गरज असल्याचे सांगितले नागरप्लिकेने त्याला पूर्वीसारखा मजबूत करून त्याच्या सौंदर्यात भर पाडावी आणि वाहतूक सुरक्षित करून अनर्थ टाळावेत यासाठी लगेच प्रस्तावाची मागणी केली आणि मुख्याधिकारीनी करारनामा करून घ्यावा असेही सांगितले त्यांनंतर आमदार पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत कोरोनामुळे शासनाकडून आर्थिक तरतूद होणे शक्य नसल्याबाबत चर्चा झाली म्हणून तातडीची पालिकेच्या माध्यमातून हे काम करणे उचित होईल असे ठरले यावेळी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील , एल टी पाटील हजर होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button