Amalner

?️ अमळनेर कट्टा..ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकित खेडी येथील ग्रामविकास पॅनलने जोरदार मुसंडी मारत प्रचंड बहुमताने विजय संपादित केला..

?️ अमळनेर कट्टा..ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकित खेडी येथील ग्रामविकास पॅनलने जोरदार मुसंडी मारत प्रचंड बहुमताने विजय संपादित केला..

अमळनेर : गृप ग्राम पंचायत खेडी खुर्द व सीम(प्र ज) येथील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकित खेडी येथील ग्रामविकास पॅनलने जोरदार मुसंडी मारत प्रचंड बहुमताने विजय संपादित केला आहे.
खेडी गावात या सार्वत्रिक निवडणकित एकूण तिन प्रभाग होते प्रभाग १ मध्ये एकूण तीन उमेदवारांचे आरक्षण जाहीर झाले होते त्यामध्ये अनुसूचित जाती पुरुष, सर्वसाधारण महिला,व ना.मा.प्रवर्गातून एक महिला असे आरक्षण जाहीर होते त्यापैकी नामाप्र या प्रवर्गातुन सौ आशाबाई ज्ञानदेव पाटील यांची बिनविरोध निवडणूक झाली होती परंतु राहिलेल्या २ जागांसाठी अतिशय चुरशीची व प्रतिष्ठेची निवडणूक झाली त्यात सौ शोभाबाई भास्कर पाटील, व दिपक दाजभाऊ भिल या दोन उमेदवारांनी प्रचंड बहुमताने विजय संपादक करून खऱ्या अर्थाने ग्रामविकास पॅनलला बळकटी दिली.

प्रभाग क्रमांक २ मध्ये २ जागेचे आरक्षण जाहीर झाले होते त्यात सर्वसाधारण स्त्री व ना मा प्रवर्गातून पुरुष असे दोन उमेदवार होते पैकी सौ मंगल ज्ञानेश्वर पाटील यांची बिनविरोध निवडणूक झाली होती पण पॅनल प्रमुख प्रा ज्ञानदेव पाटील यांना प्रचंड विरोध होऊनही जनतेने प्रचंड जनादेश देत त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केला आणि सर्वसामान्य जनतेला प्रचंड आनंद झाला

त्या मागची पार्श्वभूमी अशी की प्रा ज्ञानदेव देवराम पाटील हे पुण्यातील नामांकित शिक्षण संस्थेत गेल्या ३५ वर्षांपासून ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत होते हे करत असताना त्यांनी मात्र गावाशी नाळ कायम जोडलेली ठेवली प्राचार्य पदावरून निवृत्त झाल्यानंतर आपण समाजाचे काही देणे लागतो ह्या भावनेने प्रेरित होऊन गावात कोणत्याही पदावर नसताना गेल्या ५ वर्षांपासून जनतेची अविरत सेवा केली आणि त्याचे फलित म्हणून जनतेने उत्तम जनादेश दिला

श्री पाटील हे २००५-२००६ या वर्षातील गुरुवर्य बा.ग.जगताप सुवर्णपदक व गुणवंत आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित असून पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे २००६ मध्ये ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’प्राप्त शिक्षक आहेत तसेच त्यांच्या घरात राजकीय पाश्वभूमी असून या अगोदर त्यांचे दोन मोठे बंधू सरपंच पदावर विराजमान होते तसेच पाटील हे अमळगाव विविध कार्यकारी सोसायटी चे चेअरमन पदावरही २०१८-१९ साली विराजमान होते

तसेच प्रभाग क्रमांक ३ मध्ये २ जागेसाठी आरक्षण जाहीर झाले होते त्यापैकी सर्वसाधारण पुरुष जागेवर उच्चशिक्षित शिक्षक हिरालाल दत्तात्रय पवार यांची एकमताने बिनविरोध निवड झाली तर सौ मनीषा चंद्रशेखर पाटील यांची सर्वसाधारण स्त्री पदावर बिनविरोध निवडुन आल्या आहेत

निवडणूक आलेल्या सदस्यांकडून गावाचा विकास व्हावा ही अपेक्षा जनतेने व्यक्त केली आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button