Aurangabad

जाधववाडी येथे अनोळखी 40 वर्षीय व्यक्तीचा खून

जाधववाडी येथे अनोळखी 40 वर्षीय व्यक्तीचा खून
गणेश ढेंबरे औरंगाबाद
औरंगाबाद : नवा मोंढा जाधववाडीतील जनरल व्यापार संकुलाच्या छतावर अनोळखी ४० वर्षीय व्यक्तीचा ठेचून खून करण्यात आल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.
या प्रकरणी सिडको ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरुध्द खूनाचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवा मोंढा जाधववाडी येथील जनरल व्यापारी संकुलाच्या छतावर नेहमीप्रमाणे आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास काही लोक लघुशंका करण्यासाठी गेले असता तेथे अनोळखी व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेला असल्याचे दिसून आले.
त्यांनी लगेच पोलिसांना ही घटना कळविली. यानंतर पोलीस उपायुक्त दिपक गिऱ्हे, पोलीस निरीक्षक अशोक गिरी, पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, सहाय्यक निरीक्षक सुनील अरबाड, फौजदार बाळासाहेब आहेर, आणि गुन्हेशाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा करून शोध सुरू केला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button