Manmad

मिटर रींडीग घेवून वीज बिल द्यावे : वीज ग्राहकांची मागणी

मिटर रींडीग घेवून वीज बिल द्यावे : वीज ग्राहकांची मागणी

मनमाड I आप्पा बिदरी
देशात आणि राज्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यापासून मनमाड शहरातील सर्व व्यापार,उद्योग आणि आस्थापना बंद असुन मात्र जीवन आवश्यक वस्तुंचे दुकाने सुरु आहेत. शहराती जवळपास ८० टक्के व्यापार बंद असताना या व्यावसायिकांना आणि शहरातील नागरिकांना वीज वितरण कंपनीकडून सरासरी वीज बिल कोणत्या धर्तीवर पाठवले जात आहे.महावितरणाने याबाबत विचार करून रिडींग घेऊन ग्राहकांना वीज बिले द्यावी,अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातर्फे लॉक डाऊनचे कारण सांगत विज बिल ऑनलाईन भरण्याचा मेसेज आणि तो हि इंग्रजीमध्ये वीज ग्राहकांना पाठवला आहे.त्यामुळे अनेक नागरिकांनी संताप व्यक्त करीत आहे.

सोशल डिस्टटिंगचा कुठलाही संबंध नसताना गेल्या दोन महिन्यापासून शहरातील सर्वसामान्य ग्राहकांना वीज बिल मिळालेले नाही.वीज वितरण कंपनीकडून कोणतेही मीटर रिडींग घेतले गेलेले नाही.सर्वसामान्य ग्राहकांना सरासरी वीज बिले पाठविले आहेत. अनेक वीज ग्राहकांना हा ऑनलाइन वीज बिल भरण्याचा संदेश इंग्रजीमध्ये असल्याने तो कळणार सुद्धा नाही. त्यात उन्हाळ्याचे दिवस असल्याने वीज वापर जास्त आहे.आता वीज वितरण कंपनी सरासरी बिल देऊन नंतर आगामी दोन-तीन महिन्यांच्या काळात रिंडीग प्रमाणे बिल देणार आहे. तसे झाल्यास पुढील येणारी वीज बिले ही अवास्तव आणि जास्तच येऊ शकनार आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना याचा जास्त त्रास होणार आहे.तसेच वीज वितरण कंपनीची मीटर रिंडीग घेणारी आणि बिले वाटणारी यंत्रणा ही खाजगी असताना कोविंड-१९ चे कारण दाखवून वीज ग्राहकांची दिशाभूल करण्यात येत आहे. शहरातील ५० टक्के पेक्षा जास्त वीज मीटर एकत्रित खांबावर लावले असताना रीडिंग एजन्सीचे काम सुरक्षितरित्या होऊ शकते. गेल्या २२ मार्च पासून म्हणजे दोन महिन्यापासून किराणा, दूध विक्रिते, मेडिकल या जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडली तर ८०% व्यापार बंद असताना त्या व्यापारी वर्गाने वीज वापर केलेला नाही .त्यामुळे कोणत्या आधारावर त्यांना सरासरी वीज बिल दिले जाणार या बद्दल प्रश्न उपस्थित केला असून वीज वितरण कंपनीच्या या बेजबाबदारपणामुळे जून-जुलै महिन्यात नक्कीच वीजग्राहकांना मोठे वीजबिले मिळणार असून त्याचा उद्रेक ही होण्याची शक्यता वर्तविली आहे.

वीज कंपनीने त्वरीत मिटर रिडींग घेऊन वीज ग्राहकांना रिडिंगप्रमाणे बिले द्यावी व बिल भरणा केंद्रही सुरू करावीत ग्राहक कायद्यानुसार ऑनलाइन बिल भरणे बंधनकारक नसून पर्याय असू शकतो. वीज वितरण कंपनीने त्याची सक्ती करू नये.प्रत्येक विज ग्राहकाला घरपोच बिले देण्याची व्यवस्था करण्यात यावी. – नितिन पांडे, जिल्हा उपध्यक्ष, भाजपा

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button